अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात सुरक्षा शिबिर संपन्न
अहिल्यानगर - केडगाव येथील अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात
केडगाव महालक्ष्मी एचपी गॅस एजन्सी येथील सोनाली दरेकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली गॅस सुरक्षा शिबिर संपन्न झाले.
केडगाव महालक्ष्मी एचपी गॅस एजन्सी येथील सोनाली दरेकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली गॅस सुरक्षा शिबिर संपन्न झाले.
एल .पी. जी. सिलेंडर आणि संबंधित उपकरणांचा सुरक्षित वापर करून अपघात कसे टाळता येतील याविषयीचे मार्गदर्शन व माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रात्यक्षिक करून सांगितली. सुरक्षा शिबिरामध्ये एलपीजी सिलेंडर ची योग्य हाताळणी आणि साठवणूक कशी करावी, संभाव्य गॅस गळती ओळखून त्यांचे निराकरण कसे करावे, गॅस स्टोव्ह आणि इतर उपकरणांचा सुरक्षित वापर कसा करावा तसेच गॅस गळती किंवा आग लागल्यास कोणती काळजी घ्यायला हवी याविषयी खालीलप्रमाणे सर्व माहिती दिली.
नळीची तपासणी:तुमच्या गॅस रेग्युलेटर आणि नळीची नियमित तपासणी करा. गळती आढळल्यास त्वरित दुरुस्ती करा, असे अनेक अहवाल सांगतात.
सिलेंडरची तपासणी:सिलेंडर नेहमी उभ्या स्थितीत ठेवा आणि गॅस गळतीसाठी नियमित तपासणी करा.
नियंत्रक (Regulator):योग्य आणि प्रमाणित नियंत्रकाचा वापर करा.
सुरक्षितता शिबिरे:
गॅस कंपन्यांच्या सुरक्षितता शिबिरांमध्ये सहभागी व्हा आणि सुरक्षाविषयक माहिती मिळवा.
गॅस गळती:गॅस गळती झाल्यास घरात हवेशीर करा आणि त्वरित दुरुस्तीसाठी संपर्क साधा
एलपीजी अत्यंत ज्वलनशील आहे आणि स्फोटामुळे मोठे नुकसान होऊ शकते. सिलिंडर वापरताना काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. गळती तपासावी, पाईप्स चांगल्या स्थितीत असल्याची खात्री करावी आणि गॅस वापरताना सावधगिरी बाळगावी. जागरुकता आणि दक्षतेने अशा अपघातांना आळा बसू शकतो.
या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. योगेश बाफना व तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी यांनी या प्रात्यक्षिकचा उपस्थित राहून अनुभव घेतला.

