नगर-कल्याण रोड येथील गणपती मंदिर परिसरातील विकासात्मक कामाला प्रारंभ

 नगर-कल्याण रोड येथील गणपती मंदिर परिसरातील विकासात्मक कामाला प्रारंभ

माजी नगरसेवक पै. सुभाष लोंढे यांच्या हस्ते उद्घाटन; पै. महेश लोंढे  यांचा पाठपुरावा
 मनापासून काम केल्यास विकास अटळ -पै. महेश लोंढे


नगर - नगर-कल्याण रोड येथील ओपन स्पेस मधील गणपती मंदिर परिसरात सुशोभीकरणाचे काँक्रिटीकरण आणि पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या विकासकामाचे उद्घाटन माजी नगरसेवक पै. सुभाष लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर काम माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निधीतून, युवा सेनेचे शहरप्रमुख पै. महेश लोंढे यांच्या पाठपुराव्याने मार्गी लावण्यात आले आहे.


या उद्घाटनप्रसंगी माजी नगरसेवक ॲड. धनंजय जाधव, युवा सेनेचे शहरप्रमुख पै. महेश लोंढे, सामाजिक कार्यकर्ते अभिजीत बोरुडे, विजय गाडळकर, कल्याणी केसकर, सविता कोटा, एल.बी. म्हस्के, प्रा. भगवानराव काटे सर, पारुनाथ ढोकळे सर, खांबकर सर, ठुबे सर, पाटील सर, होळकर सर, सुंभे सर, मगर सर, देवकर सर, जवरे सर, शिंदे सर, मनोहर गोबरे सर, सोमनाथ देवकर, संजय सोंदकर, शिंदे सर, शिंगवी सर, सिद्धांत देवकर, सिद्धेश जवरे, कमलेश नरसाळे, सागर गीते, वैभव वाघमारे, विवेक सोनवणे, निनाद सोंदकर, शंतनू गाडळक आदींसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


युवा सेनेचे शहरप्रमुख पै. महेश लोंढे म्हणाले की, गणपती मंदिर परिसरातील सुशोभीकरण हे केवळ एका कामाची सुरुवात नाही, तर प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा शुभारंभ आहे. प्रभागातील प्रलंबित विकास कामे आम्ही टप्प्याटप्प्याने मार्गी लावत आहोत. मनापासून काम केल्यास विकास अटळ आहे. रस्ते, पाणीपुरवठा, प्रकाशयोजना आणि स्वच्छता या प्रत्येक क्षेत्रात नियोजनबद्ध सुधारणा करण्याचे आमचे ध्येय असून, त्या दिशेने कार्य सुरु आहे. केवळ उद्घाटनापुरते मर्यादित न राहता, प्रत्यक्ष विकास कामे प्रत्यक्षात उतरवीत आहोत. नागरिकांच्या सहकार्याने आदर्श प्रभाग उभारण्याचा संकल्प केला असल्याचे त्यांनी सांगितले.


 प्रा. भगवानराव काटे म्हणाले की, कल्याण रोड परिसरातील विकासासाठी पै. महेश लोंढे आणि अभिजीत बोरुडे यांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे. पाणीपुरवठा, रस्ते आणि नागरी सुविधांच्या प्रश्‍नांवर त्यांनी सातत्याने लक्ष केंद्रित करून समाधानकारक कामगिरी केली आहे. नागरिकांशी थेट संवाद साधून समस्यांचे निराकरण करणे ही त्यांच्या कार्यपद्धतीची वैशिष्ट्ये असल्याचे त्यांनी सांगितले.


माजी नगरसेवक ॲड. धनंजय जाधव म्हणाले की, महायुती सरकारच्या काळात शहराच्या विकासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याने विविध कामांना गती मिळाली आहे. नागरी सोयी-सुविधांपासून रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात कामे गतीमान झाली आहेत. ही विकासयात्रा अखंड ठेवण्यासाठी आगामी महापालिकेत पुन्हा महायुतीला संधी देणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांनी या विकासकामाबद्दल समाधान व्यक्त करत प्रभागाच्या प्रगतीसाठी ही चांगली सुरुवात असल्याची भावना व्यक्त केली. राबवलेली ही कामे नागरिकांसाठी सुविधा निर्माण करणारी ठरत असून, गणपती मंदिर परिसर आता नव्या रुपात उजळून निघणार असल्याची उपस्थितांनी अपेक्षा व्यक्त केली.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!