अडुळसा औषधी वनस्पती

अडुळसा औषधी वनस्पती 

अडुळसा ही सदाहरित झुडूप स्वरूपाची औषधी वनस्पती आहे. शास्त्रीय नाव अ‍ॅधॅटोडा व्हॅसिका असे आहे. भारतात व श्रीलंका, म्यानमार व मलेशिया या देशांत ती आढळते. 

वनस्पती कोकण दख्खनच्या पठारावर शेताच्या बाजुला लावले जाते. अडुळसा अडीच मीटर वाढते. पाने ही साधी व मध्यम आकाराची व लांबट असते. ऑगस्ट पासून फांदीच्या टोकास फुले येतात. 

फुलांचा रंग पांढाराट रंगाचे असतात. फळ हे लांबट आणि टोक असलेले असते. 


औषधांत वापरली जाणारी भाग

सर्वच भाग म्‍हणजे -  मुळे, खोड, पाने, फुले व फळे इ.


आजारांवर अडुळसा औषध 

- व्‍हायरल इनफेक्‍शन - कफ, दमा, खोकला आणि विविध श्वसन आजारांवर उपयोगी.

पानांचा रस अतिसारात गुणकारी असतो. त्याचा रस, मध, सुंठ, मिरी व पिंपळी यांचे मिश्रण कफ व कास यांवर देतात.

- पानांत वासिसाईन हे अल्कलॉइड आणि अ‍ॅडॅथोडिक आम्ल असते. हृदयाच्या आजारांवरही या वनस्पतीचा उपयोग केला जातो.

आयुर्वेदातील उल्लेख

दोन हजार वर्षांपूर्वीपासून या औषधी वनस्पतीचा उपयोग केला जात असावा. अडुळशापासून आयुर्वेदीय पद्धतीने बरेच औषधे तयार केली गेली आहेत. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!