आपला भारत देश हा शेती प्रधान देश म्हणून ओळखला जातो, यामुळे शेळी या प्राण्याला गरीबांची व शेतकर्यांची गाय म्हणून ओळखले जाते. भारतात सर्वत्र वेगवेगळ्या स्वरुपात शेती केली जाते. त्यामुळे बागायत व कोरडवाहू शेती केली जाते. यात पावसाच्या पाण्यावर आधारित शेती व पाटबंधारेंच्या आधारे केली जाणारी शेती. कोरडवाहू शेतकर्यांसाठी शेळी पालन हा एक फार महत्वाचा घटक आहे. पृष्ठभागाच्या जमिनी असलेल्या शेतकर्यांना या गाय आणि इतर जनावरांसाठी चांगल्या नसतील परंतू शेळी या व्यवसाय उत्तम पर्याय आहे. शेतकर्यांना अगदी कमी गुंतवणूकीतून हा व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो.
पात्रता -
* लघु आणि मध्यम शेतकरी
* ज्यांच्याकडे जमीन नाही असे श्रमिक
* सामान्य कुरणांची उपलब्धता
कारणे -
* भांडवल गुंतवणूक कमी व नफा लवकर मिळते.
* कमी खर्चात लहान लहान शेड व साधारण असेल तरी चालेल.
* शेळ्यांची जननदर चांगले.
* वर्षभर सांभाळ
* शेळ्यांची चरबी कमी असल्यामुळे सर्व लोकांना आवडणारे
* शेळ्या व बोकड विकून लगेच कमाई करता येते.
जाती -
जमनापरी - चांगली उंची असलेले जनावर, प्रौढ जमनापरीमध्ये चांगले सुबक बाकदार रोमन नाक आणि किमान 12 इंच लांबीचे हेलकावे घेणारे कान, बोकडाचे वजन सुमारे 65 ते 85 किलोग्राम असते व शेळ्यांचे वजन 45 ते 60 किलोग्राम असते. प्रत्येक विण्याच्या वेळी एकच करडू - सहा महिन्यांच्या करड्याचे वजन सुमारे 15 किलोग्राम असते
दर रोज किमान 2-2.5 लिटर दुधाचे उत्पादन.
तेलीचेरी - शेळ्यांचा रंग पांढरा, भुरा किंवा काळा असतो. एका विण्यात 2-3 करडी, बोकडाचे वजन सुमारे 40 ते 50 किलोग्राम असते व शेळ्यांचे वजन 30 किलोग्राम असते. बोअर- संपूर्ण विश्वभरात मांसाकरीता पाळतात, वाढीचा दर तीव्र आहे, बोकडाचे वजन सुमारे 110 ते 135 किलोग्राम असते व शेळ्यांचे वजन 90 ते 100 किलोग्राम असते. 90 दिवसांच्या करड्याचे वजन 20-30 किलोग्राम असते.
आहार -
* चरण्याच्या जोडीला घन आहार दिल्यास उच्चतम वाढ दर मिळतो.
* प्रोटीनयुक्त हिरवा चारा जसे अकेसिया, ल्यूसर्न आणि कसावा तसेच आहारात नायट्रोजन स्त्रोत असणे महत्वपूर्ण आहे.
* शेतकरी शेताच्या कडेने अगाथी, सबाबुल आणि ग्लॅरिसिडियाची झाडे लावू शकतात आणि हिरवा चारा म्हणून देऊ शकतात.
* एक एकराच्या जमिनीच्या क्षेत्रात उगविलेली झाडे आणि चारा 15 ते 30 शेळ्यांना पोसण्यासाठी पुरेसा आहे.
करड्याचा आहार, वृध्दि आहार, स्तनपान
गर्भारशेळीचा आहार - ज्वारी, डाळी, तेलवड्या, गवताचा भुसा, खनिज मिश्रण, सामान्य मीठ,
करड्यांना पहिल्या 10 आठवड्यांत सांद्रित आहार द्यायला पाहिजे. वाढत्या वयाच्या करड्यांना 10 महिन्यांपर्यंत दररोज सांद्रित आहार द्यावे. गाभण असलेल्या शेळीला दररोज सांद्रित आहार, एक लिटर दूध देणार्या दुधारू शेळ्यांना दररोज सांद्रित आहार, मिनरल ब्लॉक्स पुरविण्यात यावे.
प्रजोत्पादन - शेळी पालनासाठी दोन वर्षांमध्ये 3 वेळा व्यायला हवे. वाढीच्या व मोठ्या आकाराच्या शेळ्यांचा प्रजोत्पादनासाठी वापर करावा. प्रजोत्पादनासाठी एक वर्ष वयाच्या मादीचा उपयोग होतो.
3 महिन्यांतच पुन्हां गर्भ धारण केल्यासच 2 वर्षांत 3 वेळा प्रजोत्पादन होते. शेळ्या सुमारे 18 ते 21 दिवसांच्या अंतराने माजावर येतात, अवस्था 24-72 तासांपर्यंत टिकते. माद्या माजावर आल्यावर काहीतरी दुखत असल्यासारखे जोराने ओरडतात, माजावर आल्याचे आणखी एक लक्षण म्हणजे शेपटी जोर-जोराने इकडे-तिकडे हलवितात. त्याच्या जोडीला, त्यांचे बाह्य जननेंद्रिय थोडे-से सुजल्यासारखे आणि योनिमार्गातील स्त्रावामुळे ओले, घाणेरडे दिसतात. भूक मंदावते, मूत्रत्यागाची वारंवारता वाढते. माजावर आलेली मादी स्वत: नर असल्यासारखी इतर मादीच्या अंगावर चढण्याचा प्रयत्न करते, इतर मादीस अंगावर चढू देते.
माजावर येण्याची लक्षणे सुरू झाल्यावर 12 ते 18 तासांच्या काळांत मादीचा समागम घडविण्यात येतो. काहीमध्ये माज 2 ते 3 दिवसापर्यंत राहतो. त्यामुळे त्यांचा समागम पुन्हां दुसर्या दिवशी घडवायला हवेत. गर्भावस्था काळ सुमारे 145 ते 150 दिवसांचा असते, पण एक आठवडा पुढे-मागे होऊ शकतो.
पोटातील जंत नष्ट करणे -
लसीकरण -
धनुर्वाताच्या लसीकरणाचा प्रथम डोज 8 महिन्यांच्या वयात आणि आणखीन 12 आठवड्यांची झाल्यावर द्यावा. माद्यांना एन्टरोटॉक्सिमिया आणि धनुर्वाताच्या लसीकरणाचा डोज समागम काळाच्या 4 ते 6 आठवडे आधी आणि विण्याच्या 4 ते 6 आठवडे आधी द्यावे. नरांना वर्षातून एकदा एन्टरोटॉक्सिमिया आणि धनुर्वाताच्या लसीकरणाचा डोज द्यावा.
गोठा - डीप लिटर सिस्टम, लहानसा कळप ठेवण्यासाठी पुरेशा आकाराचे शेड ज्यांमध्ये चांगले वातावरण. लिटरची (गवताच्या गादीची) उंची कमीत कमी 6 सें.मी. असावी. लिटर तयार करण्यासाठी लाकडाचा भुगा, धान्याचा भुसा आणि शेंगांच्या सालपटांचा वापर करावा. लिटरला थोड्या दिवसांनी वरखाली आलट-पालट करीत राहावे ज्याने घाण वास येत नाही. दर दोन आठवड्यांनी लिटर सामग्री बदलावी. प्रत्येक शेळीला सुमारे 15 चौरस फुट जागा हवी असते.
एक प्रौढ शेळी एका वर्षांत सुमारे एक टन खत टाकते. जमिनीपासून 3 ते 4 फुटांवर लाकडी तख्त किंवा तारांची जाळी यांचा वापर ह्या पध्दतीत केला जातो.
संगोपन -
कमी कुरणे असतील अशा जागा, शेळ्यांना मुबलक हिरवा चारा देणे शक्य असेल आणि चरल्या नंतर घन आहार देता येईल. शेडमध्ये शेळ्यांना हिरवा चारा आणि घन आहार देण्यात येतो. शेळ्यांसाठी गोठा (किंवा आश्रयस्थाने) डीप लिटर किंवा रेझ्ड प्लॅटफॉर्म सिस्टमची असावीत.
विमा -4 महिने वयापासून शेळ्यांचा विमा जनरल इन्शुअरन्स कंपनीज् मार्फत काढला जाऊ शकतो. अपघात किंवा रोगामुळे शेळीला मरण आल्यास विम्याचा दावा केला जाऊ शकतो.
शेळ्यांचे फार्म - नादूर शेळी फार्म, शिवाजी पार्क शेळी फार्म.




thanks viwers
ReplyDeleteinformation about good
ReplyDeletenice
ReplyDeleteFarming side business.
ReplyDelete