मधुमेह

मधुमेह

मधुमेहाचे तीन प्रकार पडतात - प्रकार- १ मधुमेह, प्रकार २ मधुमेह, गर्भधारणेमुळे होणारा मधुमेह. प्रकार- १ मधुमेह – सामान्यतः या आजाराची सुरुवात बालपणापासून किवा तरुण वयामध्‍ये होते. या आजाराचे निदान बालपणातच होऊ शकते, हया आजाराची सुरुवात अचानक पणे होऊन रुग्‍णांस जीवंत राहण्‍यांस इन्‍सुलिन ची आवश्‍यकता असते. शरीरातील स्‍वादुपिंडाच्‍या पेशीचे स्‍वयंरित्‍या नाश होऊन हा आजारा होतो. हया आजारात सामान्‍यत कौटुंबिक इतिहास आढळत नाही.

रक्तातली साखर कमी झाल्यास

मधुमेह म्हणजे डायबेटिस ह्या रोगामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण कमी किंवा जास्त होते आणि रोगी बेशुद्ध पडू शकतो. सर्वच स्त्रीपुरुषांचे बेशुद्ध न होणे हे त्यांच्या रक्तातील साखरेच्या योग्य प्रमाणावर अवलंबून असते. मधुमेहाच्या स्थितीवर उपचार न केल्यास कालांतराने अशा व्यक्तीच्या रक्तातील साखरेचे प्रमाण फारच वाढते आणि ती बेशुद्ध पडू शकते.

रक्तातली साखर कमी झाल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण उपचारामुळे अचानक कमी झाले तर पेशींचे कामकाज मंदावून ग्लानी (चक्कर) येते. खूप डोके दुखणे,छातीत धडधड, घाम, भीती, थरथर, मळमळ, खूप भूक, थकवा, चक्कर, डोळयाला अंधारी, गोंधळलेली मानसिक अवस्था, कधीकधी झटके आणि बेशुध्दी, इत्यादी परिणाम साखरेचे प्रमाण उतरल्याने होतात. मधुमेहात कडक उपास किंवा जास्त व्यायाम यांपैकी कशानेही रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होऊ शकते. रक्तातील साखर फारच कमी झाल्यास अशा व्यक्ती बेशुधदेखील होतात व ह्या काळात ही व्यक्ती असंबंध बोलते किंवा चिडचिडी, विचित्र वागते. योग्य डॉक्टरी इलाज मिळेपर्यंत ह्या बेशुद्धीचे रूपांतर कोमातदेखील होऊ शकते.


प्रथमोपचार

सुरुवातीच्या लक्षणांमध्ये साखर खायला द्या. मात्र ती बेशुद्ध झाल्यास तोंडावाटे काहीही देऊ नका आणि ताबडतोब डॉक्टरांना बोलवा.

बेशुद्ध रोग्यास विशिष्ठ स्थितीमध्ये झोपवा, आणि त्याची श्वासनलिका मोकळी असल्याची खात्री करा

बेशुद्ध रोग्यास एकटे सोडून दूर जाऊ नका.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!