निसर्गाचे संवर्धन, संरक्षण करणे अत्‍यंत महत्‍वाचे : प्रा.डॉ.सलाम सर

➤ देशाच्या विकासात आपणही आपल्या कार्यातून योगदान दिले पाहिजे.

अहमदनगर /प्रतिनिधी : देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक जाती-धर्मातील हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे. त्यांच्या बलिदानातून आपणास मिळालेले स्वातंत्र्य हे आपण सर्वांनी जतन केले पाहिजे. स्वातंत्र्यानंतर अनेकांच्या योगदानातून देश प्रगतीच्‍या वाटेवर आहे.  देशाच्या विकासात आपणही आपल्या कार्यातून योगदान दिले पाहिजे. आज ग्लोबल वार्मिंगचे मोठे संकट निर्माण झाले. अशा परिस्थितीत सर्वांनी एकत्रित येवून या संकटाला सामोरे जाण्याची गरज आहे. त्यासाठी निसर्गाचे संवर्धन करुन संरक्षण करणे अत्‍यंत महत्‍वाचे आहे. विद्यार्थी दशेतच हे धडे दिल्यास निसर्गाचे महत्व कळेल, असे प्रतिपादन मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक डॉ.प्रा. अब्दुस सलाम सर यांनी केेले आहे.

     मोहंमदिया एज्युकेशन सोसायटी संचलित मौलाना आझाद उर्दू हायस्कूल व सावित्रीबाई उर्दू कन्या शाळा येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करुन ‘वसुंधरा बचाओ’ शपथ देण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक डॉ.प्रा.सलामसर, प्रमुख पाहुणे म्हणून कुतबुद्दीन जनाब, मुख्याध्यापिका फरहाना शेख, मुख्याध्यापक नौशाद सय्यद, बहार अंजुम, तलमिज सय्यद आदि उपस्थित होते. याप्रसंगी मुख्याध्यापिका फरहाना शेख यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्व सांगुन सर्वांना स्‍वातंत्र्यदिनाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या. बहार अंजुम यांनी आभार मानले.

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Thanks Watching & Reading News, Articles. Regards, Lokheet Graphic, News and Educational Purpose Channel.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!