अहमदनगर मनपाच्‍या केडगांव, भुतकरवाडी येथील प्राथमिक शाळेला भेट

शालेय कामकाजात ओंकार नगर शाळेप्रमाणे

इतर शाळांनी सुधारणा करावी. मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे

 


      केडगांव उपनगरामध्‍ये सन 2011 मध्‍ये मनपाने फक्‍त 4 विद्यार्थ्‍यांसाठी नव्‍याने सुरू करण्‍यात आलेल्‍या ओंकार नगर प्राथमिक शाळा ही सद्यस्थितीमध्‍ये स्‍वत:ची वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. आज या शाळेत 85 विद्यार्थी रचनावादी पध्‍दतीने शिक्षण घेत आहे. या शाळेला आयएसओ मानांकन प्राप्‍त करणारी अहमदनगर महानगरपालिकेची पहिली शाळा ठरली आहे. शाळेतील गुणवत्‍तापूर्ण शिक्षणामुळे अनेक पालक आपल्‍या पाल्‍यांचा प्रवेश शाळेमध्‍ये करण्‍यासाठी प्रयत्‍न करित आहेत. वर्ग कमी असल्‍याने व प्रवेश मिळविण्‍याचे पालकांचा ओघ जास्‍त प्रमाणात असल्‍याने अहमदनगर महानगरपालिकेची ओंकार नगर शाळेत अपुरे वर्ग असल्‍याने जादा वर्ग बांधणे आवश्‍यक आहे. याबाबत मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे यांनी दुपारी ओंकार नगर शाळेची पाहणी केली. यावेळी शाळेमध्‍ये डिजीटल शिक्षणासाठी दोन एलईडी टिव्‍ही व दोन कॉम्‍प्‍युटर घेतले आहे. शाळेच्‍या मुलांच्‍या सुरक्षिततेसाठी व शाळेसाठी सीसी टिव्‍ही बसविले आहे. त्‍याच धर्तीवर मनपाच्‍या प्रत्‍येक शाळेसाठी सीसी टिव्‍ही बसविणार आहे. पिण्‍याच्‍या पाण्‍यासाठी फिल्‍टर बसविण्‍यांत आलेले आहे. तसेच चांगल्‍या दर्जाचे शौचालय आहे.  त्‍या ठिकाणी पावसाचे छतावरचे पाणी साठविण्‍यासाठी आरसीसी हौद बांधकाम करण्‍यास सांगितले. तेच पाणी झाडांना देण्‍यासाठी उपयोगी होणार आहे. सदयस्थितीत ओंकार नगर शाळेची जागा अपुरी असल्‍यामुळे तेथे पुढील वर्ग घेता येत नाहीत त्‍यासाठी नगर रचना विभाग सहाय्यक संचालक, यांना केडगांव मध्‍ये त्‍या भागात मनपाचा एखादा मोठा भूखंड शाळेसाठी पाहण्‍यास सांगितले. जेणे करून 7 वी पर्यत वर्ग वाढविता येतील असे मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे यांनी सांगितले.

      मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे यांनी भुतकरवाडी येथील मनपाच्‍या शाळेची पाहणी केली. भुतकरवाडी शाळा ही मध्‍यवस्‍तीत शाळा असून शाळेला वॉल कंम्‍पाऊंड बांधण्‍याबाबत नगररचना विभागाकडून अभिप्राय घेवून काम सुरू करणार शाळेमध्‍ये एक डीजीटल वर्ग असून दुसरा वर्ग सुरू करणार आहे.

      यावेळी अतिरिक्‍त आयुक्‍त डॉ.श्री.प्रदिप पठारे यांनी सांगितले की, मनपाच्‍या प्रत्‍येक शाळा खोल्‍यांचे वर्ग वाढविण्‍यात येणार आहे. वर्ग वाढविल्‍यामुळे पटसंख्‍या वाढेल. गोर गरिब नागरिकांच्‍या मुलांना शिक्षण घेण्‍यासाठी मनपाच्‍या शाळेचा उपयोग होणार आहे. ओंकार नगर शाळेला नपा व मनपा शिक्षक संघा कडून राज्‍यस्‍तरीय आदर्श शाळा पुरस्‍कार प्राप्‍त झाला आहे. अहमदनगर महानगरपालिकेची पहिली शाळा आयएसओ मानांकन प्राप्‍त शाळा पुरस्‍कार मिळाला आहे. शाळेमध्‍ये शालेय परसबाग न्‍यायरचना अध्‍यापन, 100 टक्‍के उपस्थितीसाठी दरमहा बक्षिस , प्रत्‍येक विद्यार्थ्‍याला वाढदिवसाला रोप व पुस्‍तक भेट, क्रीडा स्‍पर्धा राबविणे , विद्यार्थी बचत बॅक तसेच प्रत्‍येक विद्यार्थ्‍यांना चांगल्‍या दर्जाचे आय कार्ड दिले आहे. असे त्‍यांनी सांगितले.   

      यावेळी मा.श्री.संभाजी कदम, माजी उपमहापौर मा.श्री.अनिल बोरूडे, नगरसेवक मा.श्री.विजय पठारे, मा.श्री.अमोल येवले, मा.श्री.सचिन शिंदे, मा.श्री.स्‍वप्निल शिंदे, मा.श्री.संग्राम कोतकर, मा.श्री.संतोष गेणाप्‍पा, अतिरिक्‍त आयुक्‍त डॉ.श्री.प्रदिप पठारे, शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी श्री.सुभाष पवार, ओंकार नगर शाळेचे मुख्‍याध्‍यापक श्री.कबाडी, पर्यवेक्षक श्री.जुबेर पठाण,श्री.किशोर कानडे आदी उपस्थित होते.


Post a Comment

2 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Thanks Watching & Reading News, Articles. Regards, Lokheet Graphic, News and Educational Purpose Channel.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!