धरण बांधणे
1
September 28, 2021
आपल्या भारत देशात केवळ पूर नियंत्रणाकरिता धरणे बांधणे जगातील एकमेव उदाहरण म्हणजे ओहायओ या राज्यातील पूर नियंत्रण योजना. अमेरिकेतील या योजनेतील 5 धरणे पूर नियंत्रणासाठी बांधलेली आहे. ती पुराचे पाणी तात्पुरते स्वरुपात साठवितात आणि इतरवेळी ती रिकामी असतात.
टेनेसी व तिच्या उपनद्यांवर जवळजवळ तिसाहून अधिक धरणे बांधून त्यांतील पाणी अनेक कारणांकरिता वापरले. यामुळे टेनेसी, व उपनद्यांतील पुरांची तीव्रता कमी होते. या प्रकल्पाला टेनेसी व्हॅली ऑथॉरिटी प्रकल्प म्हणतात.
भारतातील अशा प्रकारचे उदाहरण म्हणजे दामोदर नदी व तिच्या उपनद्यांवरील मैथॉन, कोनार, तिलैया, पानचेत ही चार धरणे व दुर्गापूर येथील दरवाजाचे धरण. या प्रकल्पामुळे दामोदर नदीच्या खोर्यातील पूर बरेचसे नियंत्रित केले गेले आहेत.
विसाव्या शतकात कित्येक बहूद्देशीय धरणे बांधण्यात आली आहेत. त्यांत अमेरिकेतील हूव्हर धरण, ग्रँड कूली धरण, फोर्ट पेक धरण, भारतातील भाक्रा, हिराकूद, राणा प्रतापसागर, नागार्जुनसागर इ. धरणे; ईजिप्तमधील आस्वान, र्होडेशियातील करिबा इ. धरणे प्रमुख आहेत. या धरणांमुळे त्यांच्या भागातील पुरांचे चांगल्या प्रकारे नियंत्रण झाले आहे.
Tags

Nice
ReplyDelete