अल-करम हॉस्पिटलच्या सोनाग्राफी सेंटरचे उद्घाटन संपन्न
सामाजिक दायित्व जपणारे हॉस्पिटल म्हणून अल-करमचा लौकिक - शितल जगताप
नगर - आज बदलत्या जीवनशैलीमुळे सर्वांनाचा आरोग्याच्या विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत. त्याच महिलांना नोकरी, कुटूंब सांभाळताना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. छोट-छोटे आजार नंतर मोठे स्वरुप धारण करत असल्याने महिलांनी वेळीच उपचार घेणे आवश्यक आहे. सोनोग्राफीमुळे अनेक आजारांचे निदान होत असल्याने ही अत्यावश्यक बाब झाली आहे. आज उद्घाटन होत असलेल्या सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना चांगल्या पद्धतीची सेवा मिळेल. अल-करम हॉस्पिटलने नेहमीच रुग्णसेवेबरोबरच सामाजिक दायित्व जपुन गरजूंना सेवा उपलब्ध करुन दिली आहे, असे प्रतिपादन नगरसेविका शितल जगताप यांनी केले.
अल-करम हॉस्पिटल अॅण्ड मेटरनेटी नर्सिंग होमच्या नवीन सोनोग्राफी सेंटरचे उद्घाटन नगरसेविका शितल जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ.जहिर मुजावर, नगरसेवक समद खान,भा.कुरेशी, तंबोली हज टुर्सचे शौकत तांबोली,आष्टी येथील मुफ्ती शफीक,मौलाना इम्तीयाजुद्दीन,डॉ.नजमा मुजावर आदि उपस्थित होते.
प्रास्तविकात डॉ.जहिर मुजावर म्हणाले, अल-करम हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना अत्याधुनिक मशिनरीच्या सहाय्याने सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. रुग्णांचे अचूक निदान करुन त्यावर उपचार होत असल्याने अनेक रुग्ण समाधानी आहेत. आता सोनोग्राफी सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना अधिक सेवा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला आहे. गरजू रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार केले जाईल, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तौफीक तांबोळी यांनी केले तर आभार डॉ.नजमा मुजावर यांनी मानले.
