रक्तदानाने गरजू रुग्णांना मोठा आधार - डॉ.रेश्मा चेडे

सक्षम फौंडेशन व चेडे हॉस्पिटलच्या रक्तदान शिबीरास युवकांचा प्रतिसाद

रक्तदानाने गरजू रुग्णांना मोठा आधार - डॉ.रेश्मा चेडे

नगर - रक्त हे कोणत्याही फॅक्टरीत तयार होत नसल्याने मनुष्याच्या रक्तदानानेच ही गरज भागवावी लागते. त्यासाठी रक्तदान करणे गरजेचे असून, आपण दिलेल्या रक्तामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. यासाठी प्रत्येकाने नियमित रक्तदान केले पाहिजे. सक्षम फौंडेशनचे सामाजिक दायित्वाचे कार्य समाजासाठी दिशादर्शक असून, अडचणीच्या काळात रक्तदान शिबीराच्या माध्यमातून गरजू रुग्णांना रक्तदान करुन मोठा आधार दिला असल्याचे प्रतिपादन डॉ.रेश्मा चेडे यांनी केले.

शिवजयंतीनिमित्त सक्षम फौंडेशन व चेडे हॉस्पिटलच्यावतीने आयोजित रक्तदान शिबीरप्रसंगी डॉ.रेश्मा चेडे, डॉ.संतोष चेडे, डॉ.विरेंद्र राजभर, डॉ.भावना मते, बाळकृष्ण सुरकुटला, डॉ.गुप्ता, विशाल गाडेकर, रोहन शर्मा, सागर उंडे, युनूसभाई तांबटकर, डॉ.परवेझ अशरफी आदि उपस्थित होते.

प्रास्ताविकात सक्षम फौंडेशनचे अध्यक्ष शाहनवाज तांबोळी यांनी सांगितले, सक्षम फौंडेशनच्यावतीने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. फौंडेशनच्या माध्यमातून रस्त्यावरील नागरिकांना ब्लॅकेंट वाटप, वाचनालयास पुस्तके, कोरोना योद्धांचा सन्मान, अन्नदान असे अनेक उपक्रम नेहमीच राबवत असतो. आजची रक्ताची गरज ओळखून या शिबीराचे आयोजन चेडे हॉस्पिटल बरोबर मिळुन केले आहे. असेच सामाजिक उपक्रम यापुढेही राबविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

रक्त संकलनाचे कार्य जनकल्याण रक्तपेढीचे श्री.पारनेरकर, जोशी व चव्हाण मॅडम, यादव आदिंनी केले. शिबीर यशस्वीतेसाठी भारती गायकवाड, आकाश लुचोर, शितल शिंदे, अर्पणा जाधव, रोहित बलैया, किरण जवेर, रझिया सय्यद, कलिमा सय्यद, अशफाक सय्यद, तलहा सय्यद, तन्वीर शेख, साजिद जहागिरदार, फरदिन शेख, जाकिर शेख, विलास पंडित, डॉ.निलेश भिंगारदिवे आदिंनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबीद दुलेखान यांनी केले. तर आभार डॉ.संतोष चेडे यांनी मानले. या शिबीरात 26 रक्त पिशव्यांचे रक्तसंकलन झाले.

सक्षम फौंडेशन व चेडे हॉस्पिटलच्यावतीने आयोजित रक्तदान शिबीरप्रसंगी डॉ.रेश्मा चेडे, डॉ.संतोष चेडे, डॉ.विरेंद्र राजभर, डॉ.भावना मते, बाळकृष्ण सुरकुटला, डॉ.गुप्ता, विशाल गाडेकर, रोहन शर्मा, सागर उंडे, युनूसभाई तांबटकर, डॉ.परवेझ अशरफी आदि.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!