वेंचुरा सिक्योरिटीज व सक्षम फौंडेशनच्यावतीने शेअर मार्केटवर मोफत कार्यशाळा संपन्न

वेंचुरा सिक्योरिटीज व सक्षम फौंडेशनच्यावतीने शेअर मार्केटवर मोफत कार्यशाळा संपन्न

योग्य प्रकारे गुंतवणक केल्यास चांगल्या प्रकारे पैसे मिळवता येऊ शकते- शाम राऊत
नगर - सध्या स्पर्धा व तंत्रज्ञानाच्या युगात मार्केट ग्लोबल झाले असून, सर्वसामान्य व ग्रामीण भागातील युवकांनी शेअर मार्केटचे ज्ञान आत्मसात करणे काळाची गरज बनली आहे. कोरोनाच्या संकटकाळात सर्व नागरिकांना पैश्याचे व आरोग्याचे महत्त्व कळाले आहे. युवकांनी एका व्यवसायावर विसंबून न राहता इतर व्यवसायाबरोबरच शेअर मार्केटमध्ये योग्य प्रकारे गुंतवणक केल्यास चांगल्या प्रकारे पैसे मिळवता येऊ शकते, असा मौलिक सल्ला वेंचुरा सेक्युरिटिसचे शाम राऊत यांनी दिला.

वेंचुरा सिक्योरिटीज लि. व सक्षम बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने बेसिक कन्सेप्ट ऑफ शेअर मार्केट या विषयावर मोफत प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी शाम राऊत, मजहर शेख, सक्षम फौंउंडेशनचे अध्यक्ष शहानवाज़ तांबोळी, डॉ.निलेश भिंगारदिवे, शशिकांत शेळके, गणेश पाथरकर, संकेत बांडे, प्रशांत पवार, अविनाश कुलकर्णी, विलास पंडित, वेंचुराचे अतीक शेख, बंटी शेख आदि उपस्थित होते.
यावेळी मज़हर शेख यांनी शेअर मार्केट, म्यूच्यूअल फंड, एन.एस.ई., बी.एस.ई. या विषयी सविस्तर माहिती दिली. तसेच प्रशिक्षणार्थीच्या शंकांचे निरसन केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सक्षम फौउंडेशनच्या सर्व पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!