महेफिले मुशायराचे रविवारी आयोजन
नगर - इदारा अदबे इस्लामी च्या वतीने राज्यस्तरीय उर्दू साहित्य परिषदेच्या समारोप मध्ये रविवार दि.27 मार्च 2022 रोजी रात्री 9 वा. सर्जेपुरा येथील रहेमत सुलतान सभागृहात महेफिले मुशायराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती इदारा अदबे इस्लामी हिंद चे महाराष्ट्रा प्रदेश अध्यक्ष प्रो.मकबुल अहमद यांनी दिली.या मुशायरामध्ये प्रमुख पाहुणे म्हणुन दिल्ली येथील इंतजार नईम, औरंगाबाद येथील डॉ.असलम मिर्झा, सैफ अली सर, अब्दुल कादिर सर, हाजी मन्सूर भाई, युनूस भाई तांबटकर, मूफ्ती अल्ताफ, के.के. खान, आबीद दुलेखान, हाजी बिलाल अहमद उपस्थित राहणार असुन या मुशायरा मध्य इंतेज़ार नईम (दिल्ली) अब्दुला राही (देवबंद) सरफराज बज्मी (राजस्थान) असलम गाज़ी (मुंबई) अबु नबील मसीहुद्दीन (हैदराबाद) जावेद नदीम (मुंबई) नज़ीर फतेहपुरी (पुणे) मकबुल अहमद (उदगीर)रफीक जाफर (पुणे)बशीर अहमद राही (जालना) उद्धव महाजन बिस्मिल (पुणे) अहमद औरंगाबादी, गुलाम फरीद (आकोट) अनीस नबील (अकोला) डॉ.कमर सुरुर, नफीसा हया, मुश्ताक अहमद मुश्ताक,सैय्यद खलील, सलीम खान यावर, आसिफ सर, मुन्नवर हुसैन हे शायर आपल्या रचना सादर करणार असल्याचे इदारा अदबे इस्लामी हिंद चे महाराष्ट्र प्रदेश सेक्रेटरी गुलाम फरीद यांनी सांगितले.
तरी या महेफिले मुशायराचा आनंद सर्व गजलप्रेमीं व उर्दू रसिकांनी घ्यावा, असे आवाहन इदारा अदबे इस्लामी च्या वतीने करण्यात आले आहे.
