शिक्षणावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या राजर्षी शाहूंचा वारसा महाराष्ट्र सरकारने जपावा, बजेटमधे शैक्षणिक कार्यावर मोठा भर द्यावा - आनंद शितोळे

शाहू स्मृतिदिनानिमित्त परिसंवाद व ईद मिलन संपन्न

अहमदनगर (प्रतिनिधी) - इंग्रजी राजवटीतील मुंबई इलाखा हा आजच्या पाकिस्तानातील सिंध प्रांत, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक या विस्तृत प्रदेशाचे इंग्रजांचे शैक्षणिक बजेट हे ८० हजार रूपये होते तर राजर्षी शाहूंच्या करवीर संस्थानचे तेच बजेट एक लाख रूपये होते. त्यांनी आपल्या रयतेच्या उन्नतीसाठी सर्वाधिक खर्च शिक्षणावर केला. ते म्हणत रयतेच्या कल्याणासाठी माझा खजिना जरी रिकामा झाला तरी चालेल पण माझी रयत पुढे गेली पाहिजे, तिची सर्वांगिण उन्नती झाली पाहिजे. रयत शिकून शहाणी व्हावी, कर्मकांड आणि शोषणमुक्त व्हावी यासाठी ते आहोरात्र झटत असत. त्यांनी सक्तीचे व मोफत शिक्षण दिले होते. प्रसंगी ते पालकांना दंड करण्यासही मागेपुढे पहात नव्हते. इतके त्यांना शिक्षणाचे महत्व माहित होते. आजचे आपले सरकार शाळा परवडत नाहीत म्हणून बंद करीयला निघालेले आहे. हि बाब राजर्षी शाहूंच्या विचारविरोधी त्यांच्या वसा वारसाला बट्टा लावणारी आहे. आपल्या शासनीने राजर्षी शाहूंचा आदर्श ठेवत, वारसा जपत मोफत शिक्षणावर भर द्यावा, बजेटमधे तशी भरीव तरतूद करावी, असे प्रतिपादन कृषी व समाजाभ्यासक आनंद शितोळे यांनी केले.
राजर्षी शाहू महाराज स्मृतिशताब्दी समितीच्या वतीने चौथे शिवाजी महाराज स्मारक येथे दि. ६ रोजी ईद मिलन आणि परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. राजर्षी शाहू महाराजांचे कार्य विषयावर संवादकांनी आपली मते मांडली.

यावेळी बोलताना 'घर घर लंगर सेवा' या उपक्रमाचे हरजीतसिंह वधवा म्हणाले कि, राजर्षी शाहू महाराजांनी सर्वधर्मसमभावावर भर देत कार्य केले. आपल्या राज्यातील सर्वधर्मिय जनता सुखी आणि संपन्न व्हावी यासाठी कार्य केले. त्यांच्या सामाजिक एकोप्याचा वारसा आपल्या सर्वांना एकजूटीने पुढे न्यायचा आहे. त्यासाठी आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत.

सोनाली देवढे-शिंदे या म्हणाल्या कि, कोणत्याही समाजात स्त्रीचा किती विकास झाला यावर त्या समाजाचे मुल्यमापन केले जाते. हे लक्षात घेता सुमारे १०० वर्षांपुर्वी महिलांच्या विकासासाठी राजर्षी शाहूंनी केलेले कार्य आजही पथदर्शी आहे. समस्त स्त्रीयांनी राजर्षी शाहूंचे आपल्याप्रति केलेले कार्य समजून घेऊन त्या विचारावर वाटचाल केली पाहिजे.

यावेळी सुधीर लंके म्हणाले कि, मिडीया जेंव्हा लोकशाहीच्या इतर खांबांची चिकित्सा करते तेंव्हा मिडीया या चौथ्या खांबाचीही चिकित्सा झाली पाहिजे. राजर्षींनी त्याकाळच्या वर्तमानपत्रे, संपादक तसेच बातमीदार यांना भरीव मदत केली होती. वृत्तपत्रसृष्टीच्या वाढीस त्यांचे सतत सहकार्य होते. या गोष्टीची जाणीव ठेवुन वर्तमानपत्रे, संपादक व बातमीदारांनी राजर्षी शाहूंचे परिवर्तनाचे कार्य पुढे नेले पाहिजे. त्यांनी शाहूंच्या कारभाराची अनेक उदाहरणे देवुन आजच्या राज्यकर्त्यांनी फक्त राजर्षींचे नाव न घेता त्यांचा कार्याचा वारसा जपला पाहिजे, असे प्रतिपादन केले.

यावेळी बोलताना डिवायएसपी अनिल कातकडे म्हणालो कि, १८ ते २५ या वयोगटातील टाळके सुधारवण्यासाठी सर्वांनी एकजूटीने प्रयत्न करावेत. शाहू महाराजांनी समतेचा व एकोप्याचा विचार दिला, त्याच विचाराची आजही गरज आहे. आज आयोजित केल्याप्रमाणे समाजप्रबोधनात्मक ईद मिलनचे कार्यक्रम शहर व जिल्ह्यात अनेक ठिकाणी होण्याची गरज आहे. आपल्या प्रास्तविकात युनूसभाई तांबटकर यांनी सांगितले कि, युवकांच्या उज्वल भविष्यासाठी 'दंगलमुक्त अभियान' सतत राबविणे गरजेचे आहे, यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. तरूणांचे प्रबोधन केल्यास ते नक्की सुधारतात, यावर आपला भरोसा आहे. फक्त आपण एकजूटीने प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी पोलिस प्रशासनानेही पुढाकार घ्यावा. राजर्षी शाहू महाराजांचा आदर्श घेत आपण सामाजिक सलोखा राखु, त्यांचा विचार पुढे नेवू, असे ते म्हणाले.

परिसंवादाचे अध्यक्ष भैरवनाथ वाकळे यांनी सांगितले कि, राजर्षी शाहू महाराज स्मृतिशताब्दी समितीच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यामधे सर्वांनी सहभागी व्हावे. राजर्षींच्या विचारांचा आदर्श समोर ठेवुन सर्व जातीधर्माच्या स्त्रीपुरूष, विद्यार्थी यांच्यासाठी विविध योजना आणि कार्य करू.
कार्यक्रमास आरपीआयचे अशोक गायकवाड, माजी समाजकल्याण अधिकारी रफिक मुन्शी, न्यू लॉ कॉलेजचे प्राचार्य एम. एम. तांबे, सुजाता पाअुलबुधे, प्रा. डॉ. बाळासाहेब पवार, तोफखाना पोस्टेच्या ज्योती गडकरी, कोतवाली पोस्टेचे संपत शिंदे, रेव्हरंड जनार्दन वाघमारे, महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते विनित पाअुलबुधे, शाकिर शेख, प्राचार्य डॉ. प्रशांत शिंदे, नगरसेवक असिफ सुलतान, राष्ट्रवादीचे संजय सपकाळ, उबेद शेख, अॅड. शिवाजी डमाळे, अरूण खिची, अशोक सब्बन, बाळासाहेब मिसाळ, पांडुळे मामा, बबलु सय्यद, प्राचार्य खासेराव शितोळे, प्रकाशमामा साळवे, भाऊसाहेब थोटे, एजाज खान, दिपक वर्मा, दत्ता वामन, रावसाहेब काळे, अनिस इंजिनिअर, शफी जहागिरदार आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जीवन सुरूडे, आर्किटेक्ट अर्शद शेख, इंजी. अभिजीत एकनाथ वाघ, असिफखान दुलेखान, संध्याताई मेढे, रामदास वागस्कर, रविंद्र वाबळे, सय्यद समी, फिरोज शेख, दिपक शिरसाठ, अरूण थिटे, दत्ताभाऊ वडवणीकर, तारीक शेख, नादीरखान नूरखान, आबिद खान, महादेव भोसले, राजु नन्नवरे, आसाराम भगत यांनी प्रयत्न केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. महेबुब सय्यद यांनी करून दिला. सुत्रसंचालन प्रा. डॉ. बापु चंदनशिवे तर आभार अहमदनगर हॉकर्स संघटनाध्यक्ष तथा माजी नगरसेवक संजय झिंजे यांनी मानले.

राजर्षी शाहू महाराज स्मृतिशताब्दी समितीच्या वतीने ईद मिलन आणि परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. राजर्षी शाहू महाराजांचे कार्य विषयावर संवादकांनी आपली मते मांडली. यावेळी बोलताना, आनंद शितोळे, सुधीर लंके, सोनाली देवढे-शिंदे, हरजितसिंह वधवा, अनिल कातकडे, संजय झिंजे, युनूसभाई तांबटकर, महेबुब सय्यद आदी.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!