अहमदनगर सोशल फौऊंडेशन ट्रस्ट च्या पाणपोईचे उद्घाटन संपन्न
सामान्यांना उन्हाळ्यात तहान भागविणे साठी पाणपोई उपयुक्त व पुण्याचे कार्य - पै.मोसिम शेख
अहमदनगर - अहमदनगर शहरातील सामान्य नागरिक आपली पोटाची खळगी भरणे साठी रोजागारानिमित्त शहरात फिरत असतो. अशा वेळी सामान्यांना या कडक उन्हात तहान भागविणे साठी पाणपोई उपयुक्त व पुण्याचे कार्य असल्याचे व अहमदनगर सोशल क्लब न चुकता मागील कित्येक वर्षापासुन पाणपोई चे आयोजन सामान्यांसाठी करते याचे विशेष कौतुक युवक कांग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पै.मोसिम शेख़ यांनी केले. व या संघटनेचा आदर्श इतरांनी सुध्दा घेणे गरजेचे असल्याचे आणि समाजोपयोगी कार्य करण्याचे व येणाऱ्या काळात संघटनेला संपुर्ण सहकार्य करणार असल्याचे पै.मोसिम शेख़ यांनी अहमदनगर सोशल फौऊंडेशन रजि.ट्रस्ट च्यावतीने सालाबाद प्रमाणे करसेठजी रोड येथे आयोजित पाणपोई उदघाटन प्रसंगी बोलतांना व्यक्त केले.
माणसाच्या मुलभुत गरजा पैकी एक असलेले अन्नदान व पिण्याचे पाण्याचे मोफत वाटप हे कार्य जगातील कुठल्याही सामाजिक कार्यापेक्षा मोठे कार्य असुन अहमदनगर सोशल फौऊंडेशन याच कार्याला प्राधान्य देवुन कित्येक वर्षा पासुन मोफत अन्नदानाचे व पिण्याच्या पाण्याचे सुध्दा मोफत वाटप कार्यक्रम करते ही बाब अतिशय महत्वाची असुन लवकरच यांचा आदर्श घेवुन आम्ही आमच्या भागात मोफत पाणपोई चे आयोजन करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते हम्ज़ा चुडीवाला यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
मुस्लीम धर्मियात पाणी ला अनन्यसाधारण महत्व असुन तहानलेल्यांना पाणी पाजणे ही अतिशय महत्वाची व पुण्याची बाब ईस्लाम धर्मात शिकविले जाते. प्रेषित महमंद पैंगबर यांचे नातु इमाम हुसैन रजि. यांना पाण्यावाचुन हालकरून शहिद करण्यात आलेले असुन तहानलेल्यांना पाणी देणे यामुळे पुण्याचे कार्य मुस्लीम धर्मियात मानले गेलेले आहे. असे प्रतिपादन युवक कांग्रेसचे मुबीन शेख यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केले.
अहमदनगर सोशल फौऊंडेशन सर्वांना बरोबर घेवुन काम करण्याची इच्छा बाळगते व सामान्यांच्या न्याय- हक्कासाठी कार्य करीत असुन अनेक वर्षापासुन गरीब-गरजुंना मोफत ब्लँकेट्स, कपडे, शालेय साहित्य वाटप, अन्नदान, पिण्याचे पाणी आदींची व्यवस्था निशुल्कपणे करीत आहे. संघटनेला व संघटनेच्या सन्माननिय पदाधिकाऱ्यांना अनेक अवॉर्ड यामाध्यमातुन मिळालेले असुन हे आमच्या कार्याची पावती असल्याचे भावनिक उदगार अहमदनगर सोशल क्लब फौऊंडेशनचे अध्यक्ष नईम सरदार यांनी आपल्या प्रस्ताविकात नमुद केले.
अहमदनगर सोशल फाउंडेशन ट्रस्टच्यावतीने उन्हाळ्याची जाण ठेवून सालाबाद प्रमाणे रामचंद्र खुंट येथे पाणपोईचे सुरुवात करण्यात आली.यावेळी युवक काँग्रेस आयचे शहर जिल्हाध्यक्ष पै.मोसिम शेख, निसार बागवान,रुग्णमित्र नादिर खान, सामाजिक कार्यकर्ता अनवर मुन्नवर सैय्यद,हम्ज़ाअली चुडीवाला,सक्षम फाउन्डेशनचे अध्यक्ष शाहनवाज़ तांबोली, अहमदनगर सोशल फाउन्डेशन ट्रस्टचे नईम सरदार, अफजल सैय्यद,मुबीन शेख,राज मोहम्मद नुरी, सरफराज सुलतान,शाहरुख रंगरेज, मोहम्मद भाई,ज़ैद शकील, अयान नईम, अदनान उस्मान आदि उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अहमदनगर सोशल फौऊंडेशन रजि.ट्रस्ट चे कासम भाई केबलवाले, अध्यक्ष नईम सरदार, इंजि.इम्रान हाजी अन्वर खान पत्रकार, पै.मोसीम शेख, शफाकत सय्यद, हमजा अली चुडीवाला, जियाभाई तालेवाले, मीरा रंगरेज, जावेद खान, अकील शेख, अजीम राजे, राजमोहम्मद नुरी, अय्युब भाईजान, अरयान नईम आदींनी विशेष परिश्रम घेतलेत. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अन्वर मुन्नवर सैय्यद यांनी केले. तर आभार कासमभाई केबलवाला यांनी मानलेत.

