इदारा अदबे इस्लामी महाराष्ट्रच्या वतीने वार्षिक उर्दू साहित्य परिषद
पुरस्कार वितरण, पुस्तक विमोचन, व्याख्यान व ऑल इंडिया मुशायरा चे आयोजनअहमदनगर - इदारा अदबे इस्लामी महाराष्ट्रच्या वतीने रविवार दिनांक 27 मार्च 2022 रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत सर्जेपुरा येथील रहमत सुलतान हॉल मध्ये 16 व्या वार्षिक एक दिवशी उर्दू साहित्य परिषदेचे उर्दू साहित्य व कोरोना या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आले असल्याची माहिती इदारा अदबे इस्लाम हिंदी चे महाराष्ट्राचे सेक्रेटरी गुलाम फरीद यांनी दिली.
साहित्य परिषदेची सुरुवात सकाळी दहा वाजता दिल्ली येथील इंतजार नईम यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे म्हणून जमाते इस्लामी हिंद महाराष्ट्राचे अध्यक्ष रिजवानुर्रहमान खान, महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकॅडमी चे एक्झिक्युटिव्ह अधिकारी शोएब हाशमी यांच्या उपस्थितीत शायरी ची सेवा म्हणून ,"हाफिज मेरठी पुरस्कार" पुणे येथील नजीर फतेहपुरी यांना तर उर्दू नसरची सेवा म्हणून औरंगाबाद येथील डॉ.अजीम राही यांना "असमत जावेद पुरस्कार" ने सन्मानित करण्यात येणार आहे. तर अनीस नबील यांचे काव्य पुस्तक "सरमाए तन्हाई" चे विमोचन करण्यात येणार असल्याचे इदारा अदबे इस्लामी हिंदी चे महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रो. मकबूल अहमद यांनी सांगितले.
दुपारच्या सत्रात निबंध वाचन महाराष्ट्र उदयगिरी कॉलेजचे उर्दू विभाग प्रमुख प्रा.मकबूल अहमद यांच्या अध्यक्षतेत अमरावतीच्या श्रीमती केशरबाई लाहोटी कॉलेजच्या फारसी विभाग प्रमुख मोहम्मद याहया जमील, औरंगाबादच्या मौलाना आझाद कॉलेजच्या उर्दू विभाग प्रमुख डॉ.काजी नवीद अहमद, पुसदच्या गुलाम नबी आझाद कॉलेजचे खान हसनैन आकीब व देगलूर कॉलेजचे उर्दू विभागचे डॉ.मोहम्मद अजमतुलहक्क यांचे उर्दू साहित्य व कोरोना या व अश्या वेगवेगळ्या विषयावर व्याख्यान होणार आहे. व या वरच उपस्थितांच्या प्रश्नोत्तराचे देवाणघेवाण होईल. असे मोहम्मद सलाहुद्दिन सिद्दिकी यांनी सांगितले.
तिसऱ्या सेशनमध्ये मुंबई येथील डॉ. सलीम खान यांच्या अध्यक्षतेत जळगाव येथील मोहिनुद्दीन उस्मानी, डॉ. अजीम राही (औरंगाबाद) प्रो. मोहम्मद याहया जमील (अमरावती) वली अहमद खान ,(अहमदाबाद) हे आपले मनोगत व्यक्त करतील. व परिषदेचा समारोप होईल. व रात्री ठीक नऊ वाजता ऑल इंडिया मुशायरा चे आयोजन करण्यात आले आहे.

