जंतनाशक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना गोळ्यांचे नि:शुल्क वाटप
जंतनाशक गोळ्यांमुळे मुलांचे आरोग्य सुदृढ राहिल - प्रा.डाॅ.सलाम सरनगर - मुलांमध्ये जंताच्या प्रादुर्भावामुळे कुपोषण आणि रक्ताशय होवून त्यांना सतत थकवा जाणवतो. त्यांची शारीरिक वाढ व मानसिक विकास पूर्ण होत नाही. यासाठी शासनाच्यावतीने 1 ते 19 वर्षे वयोगटातील मुला-मुलींना संस्थास्तरावर शाळा, महाविद्यालय, अंगणवाडी केंद्र व समुदाय स्तरावर जंतनाशक गोळ्या नि:शुल्क देण्यात येत आहे. यामुळे मुलांचे आरोग्य सुदृढ राहून सर्वांगिण विकास होण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन मोहंदिया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह सलाम सर यांनी केले.
मोहंदिया एज्युकेशन सोसायटी संचलीत सावित्रीबाई फुले उर्दु प्राथमिक कन्या शाळा, मौलाना आझाद उर्दू मुलींचे हायस्कुल व मदर तेरेसा उर्दू ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स अॅतण्ड कॉमर्स फॉर गर्ल्स्, मुकूंंदनगर,अहमदनगर येथे राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा.डॉ.शेख अब्दुस सलाम अब्दुल अजीज सर यांच्या हस्ते सर्व विद्यार्थीनींना जंतुनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आल्या.
कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सय्यद फरहाना मुजफ्फर, मुख्याध्यापक सय्यद नौशाद अहमद, सिस्टर खाटीक एस.एच.(.न.पा.), फरीदा जागिरदार,सय्यद तलमीज, नाजेमा शेख, नाजेमा जुल्फेकार, नौशाद सय्यद, शेख वसी आदी शिक्षक उपस्थित होते. कार्यक़्रमाचे नियोजन सय्यद बहार यांनी केले. सुत्रसंचालन सय्यद तलमीज यांनी केले तर शेवटी आभार जागिरदार फरीदा यांनी मानले.
मोहंदिया एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळा, महाविद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त संस्थेचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा.डॉ.शेख अब्दुस सलाम अब्दुल अजीज सर यांच्या हस्ते सर्व विद्यार्थीनींना जंतुनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आल्या. मुख्याध्यापिका सय्यद फरहाना मुजफ्फर, सय्यद नौशाद अहमद, सिस्टर खाटीक एस.एच.(.न.पा.), फरीदा जागिरदार,सय्यद तलमीज, नाजेमा शेख, नाजेमा जुल्फेकार, नौशाद सय्यद, शेख वसी आदि.

