महाराष्ट्राने देशात मानाचे स्थान मिळविले- प्रा.डाॅ. सलाम सर
नगर - मोहंमदिया एज्युकेशन सोसायटी संचलित सावित्रीबाई फुले उर्दु प्राथमिक कन्या शाळा, मौलाना आझाद उर्दु मुलींचे हायस्कुल, मदर तेरेसा उर्दु ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स् अॅण्ड सायन्स् फॉर गर्ल्स्, मासुमिया डी.एल.एड्.कॉलेज (उर्दु) व मासुमिया शिक्षणशास्त्र महाविद्यालय,वाबळे कॉलनी,मुकूंदनगर,अहमदनगर येथे 01 मे 2022 महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला.संस्थेचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा.डॉ.शेख अब्दुस सलाम अब्दुल अजीज सर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. प्रा.अब्दुस सलाम सर म्हणाले, आजपर्यंत महाराष्ट्राने प्रत्येक क्षेत्रात प्रगती करुन देशात मानाचे स्थान मिळविले आहे. आरोग्य, शिक्षण, उद्योग अशा सर्वच क्षेत्रात झालेले प्रगती सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाचे फळ आहे. आधुनिक शिक्षण अजून तळागळापर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. सरकारचे त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहे, त्यात सर्वांनी हातभार लावण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
मुख्याध्यापिका फरहाना सय्यद, मुख्याध्यापक नौशाद सय्यद मासुमिया डी.एल.एड्. कॉलेजचे सर्व प्राध्यापिका, मासुमिया शिक्षणशास्त्र महाविद्यायाचे सर्व शिक्षक, प्राध्यापक वृंद तसेच जबीन सय्यद, नाजेमा जुल्फेकार, नाजेमा इकबाल, नाहीद सोलापुरे, शेख असलम पटेल, फरजाना शेख, शाहीन शेख, मतीन शेख, वसीम शेख इत्यादी उपस्थित होते.
सुत्रसंचालन बहार बाजी यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे नियेाजन जागिरदार फरीदा यांनी केले व शेवटी तलमीज सय्यद यांनी आभार मानले.
मोहंमदिया एज्युकेशन सोसायटी शैक्षणिक संकुलात संस्थेचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा.डॉ.शेख अब्दुस सलाम अब्दुल अजीज सर यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

