प्राचार्य नुरील भोसले यांना राज्यस्तरीय ‘कलानंद’ पुरस्कार

प्राचार्य नुरील भोसले यांना राज्यस्तरीय ‘कलानंद’ पुरस्कार


नगर - प्रगत कला महाविद्यालयाचे प्राचार्य नुरील प्रभात भोसले यांच्या व्यक्तीचित्र कलाकृतीस प्रफुल्ला डहाणुकर आर्ट फाऊंडेशनचा कलानंद 2022 हा पुरस्कार प्रमुख पाहुणे शरयु दोषी यांच्या उपस्थिती प्रदान करण्यात आला. रोख 20 हजार रुपये,मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
या कलाकृतीमध्ये पेन्सिल माध्यमात व्यक्तीचे रेखांकन वास्तववादी प्रकारात करण्यात आलू असून, चित्रकला चेहर्‍यावरील हावभाव शरीराची ठेवण व छायाभेट या गोष्टींचा अतुलणिय परिणाम जाणवतो.

सर्व पारितोषिक प्राप्त कलाकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन मुंबई येथील जहांगिर आर्ट गॅलरी येथे 12 ते 18 एप्रिल पर्यंत कला रसिकांसाठी खुले ठेवण्यात आले होते. प्राचार्य भोसले यांच्या या यशाबद्दल त्यांचे नासिक डायोसेसन कौन्सिल संस्थेचे अध्यक्ष बीशप प्रदीप कांबळे, सचिव अ‍ॅड.विनायक पंडित यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!