न्यू आर्टस मध्ये वाद विवाद व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

न्यू आर्टस मध्ये वाद विवाद व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

न्यू आर्टस, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज (स्वायत्त), अहमदनगर मध्ये कॉम्रेड एकनाथराव भागवत यांच्या स्मृतिनिमित्त दरवर्षी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय वाद विवाद व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी स्पर्धेचे हे तेहतीसावे वर्ष आहे. राज्यभरातील स्पर्धांमध्ये मानाची समजली जाणारी ही स्पर्धा १५ व १६ मार्च २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. कनिष्ट आणि वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी स्तरावर यावर्षी वादविवादासाठी 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना देशात लोकशाही मुल्ये रुजली आहेत / नाहीत.' हा विषय देण्यात आलेला आहे. 

तर लॉकडाऊन काळातील स्त्रियांचे शोषण, नवे शैक्षणिक धोरण, सेवा क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न, राष्ट्र उभारणीत साहित्यिकांचे योगदान अशा विविध विषयात विद्यार्थ्यांना आपली वक्तृत्व कला सादर करता येऊ शकणार आहे. या स्पर्धेचे उद् घाटन मा. कॉम्रेड राम बाहेती यांच्या हस्ते आणि मा. रामचंद्रजी दरे यांच्या अध्यक्षतेखाली तर समारोप मा. कॉम्रेड सुभाष लांडे यांच्या हस्ते आणि मा. अॅड. विश्वासराव आठरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

दोन विद्यार्थ्यांचा एक गट अशा स्वरुपात राज्यातील कोणत्याही महाविद्यालयाला या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे आणि उपप्राचार्य प्रा. बी. बी. सागडे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!