प्रगत कला महाविद्यालयात वृक्षारोपण, स्वच्छता अभियान
कल्पनांना वाव मिळाल्याने कलाकृतीने निसर्ग सौंदर्यही खुलले- प्राचार्य नुरिल भोसले
नगर - कलाकाराला सभोवताली असणार्या अनेक गोष्टीत कलाकृती दिसत असतात. आपले नेहमीचे काम करतांनाही ती गोष्ट कलात्मक करण्याचा प्रयत्न करत असतो. महिला दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील परिसरात विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान राबवून वृक्षारोपण केले. या वृक्षाभोवती कलात्मक सजावट केल्याने या वृक्षांच्या सौदर्यातही भर पडली आहे. यातून विद्यार्थ्यांच्याही कल्पनांना वाव मिळाल्याने कलाकृतीने नटलेले निसर्गसौंदर्य यानिमित्त महाविद्यालय परिसरात निर्माण झाले आहे, असे प्रतिपादन प्राचार्य नुरिल भोसले यांनी केले.
प्रगत कला महाविद्यालयात राष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण, स्वच्छता अभियान राबविण्यात आले.कोरोना प्रतिबंधासाठी दुशित हवा घेऊन प्राणवायु(आॅक्सीजन ) सोडनारे विविध प्रकारचे स्नेकप्लांट स्वच्छता गृहा सभोवताली लावण्यात आले.याप्रसंगी प्रा.महावीर सोनटक्के, दिनेश अष्टेकर, संजय काळे सर, प्राचार्य नुरिल भोसले आदि उपस्थित होते.
या उपक्रमास संस्थेचे अध्यक्ष रेव्ह.डॉ.प्रदीप कांबळे, सचिव विनायक पंडित व पदाधिकार्यांनी शुभेच्छा दिल्या.

