जि.प.उर्दु शाळा भानसहिवरे येथे प्रदर्शन व बक्षिस वितरण संपन्न

जि.प.उर्दु शाळा भानसहिवरे येथे प्रदर्शन व बक्षिस वितरण संपन्न

शैक्षणिक साहित्यीक उपक्रम मेंदूला चालना देणारे- शमजा बागवान

नगर -उर्दू वाचकांची संख्या मोठी आहे. पण शिक्षण सोडून अनेक वर्षे झालेली आहे. आजच्या धकाधकाच्या जीवनात भुतकाळात शिकलेल्या गोष्टी माणूस विसरत चालला आहे. अशावेळी विशेष करुन उर्दू साहित्यातील बाबी प्रदर्शनाद्वारे मुलांनी व उर्दू विषय शिकवणार्‍या शिक्षकांनी भरपूर परिश्रम घेऊन मांडलेल्या उर्दू साहित्यिक बाबींमुळे मुलांच्या मेंदूला चालना देणारे आहे, असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या सदस्य शमजा बागवान यांनी केले.


जि प उर्दू शाळा भानसहीवरे येथे शैक्षणिक साहित्य निर्मिती व प्रदर्शन तसेच "उर्दू हप्ता" निमित्त विविध गुणदर्शन कार्यक्रम व बक्षीस वितरण करण्यात आले .यावेळी नेवासा पंचायत समिती चे उपसभापती किशोर जोजार ,भानसहिवरे चे सरपंच सौ. मिना ताई जोजार , उपसरपंच अयाज देशमुख ,ग्रामपंचायत सदस्य निलोफर देशमूख , विस्ताराधिकारी जगन्नाथ काशिनाथ नजन , केंद्रप्रमुख गो.मु. पवार,शालेय समिती चे अध्यक्षा सय्यद रुकसाना व सर्व सदस्य माता व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मकासरे सरांना निरोप व नजन सरांचे स्वागत करण्यात आले.

प्रमुख पाहूण्याचा सत्कार मुख्याध्यापिका शाहीन पटेल यांच्या हस्ते करण्यात आले,
मनोगत व्यक्त करतांना मुख्याध्यापिका शाहिन पटेल म्हणाल्या की आज हे प्रदर्शन बघून खात्री झाली की, शिक्षकांनी मनापासून काम केल्यास नक्कीच शिक्षणाचा दर्जा वाढेल. अशा प्रदर्शनाचे वारंवार आयोजित करुन मुलांमधील कौशल्याचे पालकांना जाणिव करुन द्यावी व त्यांनाही मुलांकडे लक्ष देण्याचे व अभ्यास कसा घ्यावा, याचे मार्गदर्शन शिक्षकांनी करावे, असे नमुद केले.

यावेळी पालकांनी व इतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. मुलांनी तयार केलेल्या वेगवेगळ्या प्रतिकृती व उपक्रम बघून पालकही चकीत झाले होते. त्यांनी शिक्षकांचे भरभरुन कौतुक केले.
सुत्रसंचालन शेख फरहाना यांनी केले. व आभार शेख हसीना यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!