पाश्चात्य संस्कृती, परकीय तंत्रज्ञान आणि समाज माध्यमांचे आक्रमणे थोपविण्याचे सामर्थ्य विद्यार्थ्यांमध्ये आहे : ज्ञानेश्वर कुलकर्णी

सेंट विवेकानंद स्कूल मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान


अहमदनगर : आपल्या भारताला आलेले सोन्याचे दिवस हे सहजासहजी आलेले नाहीत. यासाठी लाखोंनी आपले बलिदान देवून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. स्वातंत्र्य मिळवताना आपण किती मोठी किंमत मोजलेली आहे याचे भान आजच्या नव्या पिढीला कायम असने आवश्यक आहे. आपल्या भारतीय संस्कृतीवर आता मोठ्याप्रमाणात पाश्चात्य संस्कृती, परकीय तंत्रज्ञान आणि समाज माध्यमांचे आक्रमणे होत आहेत. ही आक्रमणे थांबण्याचे सामर्थ्य विद्यार्थ्यांमध्ये आहे. त्यांच्यावर मात करण्याचे आव्हान स्वीकारून भविष्यामध्ये एक उत्तम नागरिक होऊन देशाप्रती कर्तव्यनिष्ठा बाळगा. सेंट विवेकानंद स्कूलचे विद्यार्थी सर्वच क्षेत्रात यशस्वी होत असल्याचे पाहुन आनंद होत आहे, असे प्रतिपादन सिए असोसिएशनचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी केले.


तारकपूर येथील सिंधी एज्युकेशन सोसायटीच्या सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूल मधील शिष्यवृत्ती मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सिए असोसिएशनचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दामोदर बठेजा, सदस्य रूपचंद मोटवानी, दामोदर माखिजा, रामचंद मेंघानी, महेश मध्यान, राजू गुरुनानी, सुरेश हिरानंदानी, हरीश मध्यान, गोपाल भागवानी आदी उपस्थित होते.


यावेळी शिष्यवृत्ती मिळवलेल्या समृद्धी कुलांगे, ऋतुराज हिंगे, जीनिशा अबड, पलक पटनी, उन्नती गोणे व ऋषदा भावसार या गुणवंत विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी माध्यमिकच्या प्राचार्य गीता तांबे, प्राथमिकच्या प्राचार्य गोदावरी कीर्तानी व उपप्राचार्य कांचन पापडेजा आदींसह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.


दामोदर बठेजा म्हणाले, सेंट विवेकानंद स्कूल आज चौफेर प्रगती करत आहे. यात शिक्षकांसह विद्यार्थ्यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळेच अत्यंत प्रतिष्ठित असलेला पद्मश्री ताराबाई मोडक आदर्श शाळा पुरस्कार आपल्या शाळेला मिळाला आहे, ही केलेल्या कामाची पावती आहे. शाळेतून सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडत असल्याने ते भविष्यात कोठेही कमी पडत नाहीत.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य गीता तांबे यांनी शाळेतील विद्यार्थ्यानी मिळवलेल्या यशाची माहिती दिली. उपप्राचार्य कांचन पापदेजा यांनी आभार मानले.


तारकपूर येथील सिंधी एज्युकेशन सोसायटीच्या सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूल मधील शिष्यवृत्ती मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करताना सिए ज्ञानेश्वर कुलकर्ण. संस्थेचे अध्यक्ष दामोदर बठेजा, सदस्य रूपचंद मोटवानी,  रामचंद मेंघानी, महेश मध्यान, राजू गुरुनानी, सुरेश हिरानंदानी, हरीश मध्यान, गोपाल भागवानी,  प्राचार्य गीता तांबे, प्राथमिकच्या प्राचार्य गोदावरी कीर्तानी व उपप्राचार्य कांचन पापडेजा आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!