Inauguration of Ganesh Misal Children’s Hospital at Ahmednagar : डॉ. गणेश मिसाळ यांच्या बाल रुग्णालयाचे नुकतेच उत्साहात शुभारंभ, यातून लहान मुलांना शासकीय सेवेतून लाभ घेता येईल....
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक व समाजसेवक नजीर अहमद (नज्जु पैलवान) माजी मुजाहिद कुरेशी (भा मेम्बर), हाजी मन्सूर अब्दुल अजीज, लक्ष्मण वामन शिरसाट, नगरसेवक सचिन जाधव, नगरसेवळ मुदस्सर शेख, समाज सेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे साहेबान जहागीरदार, शेख नसीर अब्दुल्ला, दत्ता भाऊ गाडळकर, शेख मुस्ताक हाजी इब्राहिम, हाजी शेख जावेद अल्ताफ, शेख अजीम अल्ताफ, सय्यद जहीर जमीर, हाजी शकील हाजी इब्राहिम, शेख नवेद अल्ताफ, शेख शाहिद अल्ताफ, शेख मुजफ्फर नजीर, शेख जमीर मुश्ताक, ज्येष्ठ पत्रकार व समाजसेवक हाजी मन्सूर शेख, शिमला बिल्डर फ्रेंड सर्कल आदी शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले.
या परिसरातील हे पहिलेच बाल रुग्णालय सुरु होत आहे. या परिसरातील बालक आजारी पडल्यास त्याला प्रत्येकवेळी काही अंतरावर असलेल्या लहान मुलांच्या दवाखान्यात घेऊन जावे लागत असे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना रिक्षा किंवा प्रवास करून तेथे घेऊन जावा लागत असे त्यामुळे वेळेचे व आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असे आणि शहरातील इतर दवाखान्यात गर्दी पण असल्यामुळे वेळेवर उपचार मिळत नसे, संपूर्ण दिवसच या मुलाच्या आजासाठी दवाखान्यात जात असे. ही सर्व गैरसोय दूर करण्यासाठी डॉ. गणेश मिसाळ यांनी अहमदनगर शहरातील छोटी बी मस्जिदसमोर, रामचंद्र खुंट याठिकाणी सुसज्ज असे बाल रुग्णालय लहान मुलांना आरोग्याविषयी सुविधा आणि सेवा देण्यासाठी सुरू करत आहेत.
याठिकाणी दवाखान्याच्या शुभारंभी प्रसंगी ज्येष्ठ समाज सेवक नजीर अहमद (नज्जू पहेलवान) यांनी सांगितले कि, डॉक्टर गणेश मिसाळ हे आपल्या परिसरात सेवा देण्यासाठी या ठिकाणी दवाखाना उघडत आहे. मिसळ डॉक्टर हे चांगले स्वभावाचे डॉक्टर आहे त्यांना या परिसरात चांगले सहकार्य करा. लहान मुलांसोबत आलेल्या पालकांना गैरसोय होऊ नये म्हणून दवाखान्याशेजारी मेडिकलची सुविधा हि देण्यात येणार आहे त्यामुळे नागरिकांनी डॉक्टरांना सहकार्य करावे असे आवाहन केले.
समाजसेवक मुजाहिद कुरेशी म्हणाले कि, या भागात बालरोग व नवजात शिशू तज्ञ असलेले सुसज्ज असे दवाखाना उपलब्ध नव्हते आणि नागरिकांची गैरसोई होत होती. डॉक्टर गणेश मिसाळ हे प्रसिद्ध डॉक्टरांची या परिसरात ओपीडी चालू केल्यामुळे नागरिकांना चांगला सहकार्य लाभेल. शिमला फॅमिली समाजात विविध क्षेत्रात चांगले काम करत आहे. समाज घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे अल्लाह त्यांना अशीच प्रगती द्यावे. आणि समाज घडविण्याचे कार्य त्यांच्या हातून सदा घडो.
साहेबान जाहगीरदार म्हणाले, डॉक्टर मिसाळ हे अहमदनगर शहरात चांगले काम करत आहे. डॉक्टरांचे ७० बेडचे साई माउली हॉस्पिटल देखील आहे. परंतु या भागातील लोकांना तेथे जाणे गैर सोइचे होत असे त्यामुळे डॉक्टरांनी हा विचार करून शहराच्या मध्यभागी असे ओपीडी सुरु केल्यामुळे नागरीकांना फायद्याचे होईल. त्यामुळे शहराचे आमदार माननीय संग्राम जगताप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
डॉक्टर गणेश बाबासाहेब मिसाळ म्हणाले कि, गेल्या १२ वर्षांचा बालरोग तज्ञ् म्हणून कामाचा अनुभव आहे, विखे पाटील मेडिकल महाविद्यालयात असिस्टंट लेक्टरर म्हणून काम पाहिल्याचा मला अनुभव आहे, साई माउली सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल कार्यरत आहे. त्याचप्रमाणे आता अहमदनगर शहरातील छोटी बी मस्जिदसमोर, रामचंद्र खुंट याठिकाणी ओपीडी हि सुरु करण्यात आली आहे या ओपीडी ला संध्याकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे. या ओपीडी मार्फत साई माउली सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये बालरुग्णांना गरज पडल्यावर ऍडमिट ची व्यवस्था असून याठिकाणी शासकीय योजनेमार्फत महात्मा ज्योतिबा फुले योजना व कॅशलेस सुविधा हि उपलब्ध करण्यात आली आहे. गरीब पेशंट साठी मुख्यमंत्री साह्यता निधी हि उपलब्ध केली जाऊ शकते व पेशंटवर उपचार करू शकतात.
डॉक्टर गणेश विनंती करताना पुढे म्हणाले कि, लहान मुलं जर आजारी पडले तर त्यांना डायरेक्ट मिडिकल मधून जाऊन औषध देण्यापेक्षा त्यांनी एखाद्या स्पेशलिस्ट डॉक्टर कडे जाऊन सल्ला घेणे गरजेचे आहे. लहान मुलांचे औषधाचे प्रमाण हे ठरलेले असतात आणि त्याचे प्रमाण जर कमी जास्त झाले तर लहान मुलांना आपाय होऊ शकतो. त्यामुळे तञ् डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच औषधांचा उपयोग करावे.
या कार्यक्रमा प्रसंगी शहरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते व काही लहान मुलांचे चेकअप करण्यात आले.
या डॉ. गणेश बी. मिसाळ सुसज्ज बाल रुग्णालयात देण्यात येणाऱ्या काही सुविधा पुढील प्रमाणे असणार आहे -
- सुसज्ज बालरोग बाह्यरुग्ण विभाग
- लहान मुलांचे मोबाईल अडिक्शन सोडण्यासाठी टेक्निक
- नवजात शिशु शस्त्रक्रिया विभाग
- बालदमा व अँलर्जी क्लिनीक
- तापेतील झटके, फीट, मिरगी उपचार
- हाय रिस्क बेबी क्लिनीक
- पौगंडावस्थेतील मुलांना मार्गदर्शन
- डेव्हलपमेंट क्लिनीक
- प्रसुतिपूर्व बालरोग सल्ला
- चाईल्ड प्रोग्रॅमिंग टेक्नीक
- पचनसंस्थेच्या सर्व तक्रारींची तपासणी
- लहान मुलांचे अपघात उपचार
- कुपोषित बालकांचे निदान व उपचार
- लहान मुलांचे सर्व लसीकरण
- नेब्युलायज्ञेशन फॅसिलीटी उपलब्ध
- आदी सेवा पुरवली जाणार आहे.
ओपीडी वेळ - सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत
ओपीडी फी - केवळ १००/-



