अहमदनगर शहर सहकारी बँकेची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न
अहमदनगर : शहर सहकारी बँकेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक यांच्या भक्कम पाठबळावर अहमदनगर शहर सहकारी बँक पुन्हा एकदा प्रगतीपथावर येत असून या अहवाल वर्षात बँकेच्या थकीत कर्जाची वसुली चांगली झाली आहे असे प्रतिपादन बँकेचे चेअरमन सीए गिरीश घैसास यांनी केले. अहमदनगर शहर सहकारी बँकेची ५२ वी वार्षिक सभा माऊली सभागृहात संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.सभेच्या सुरुवातीला सर्व उपस्थितांच्या वतीने अहवाल वर्षात देवाज्ञा प्राप्त झालेल्या मान्यवर व्यक्ती, सभासद, बँकेचे कर्मचारी, त्यांचे नातेवाईक, नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यूमुखी पडलेले नागरिक यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर वार्षिक सभेच्या कामकाजास सुरुवात झाली. चेअरमन सीए गिरीश घैसास यांनी आपल्या मनोगतामध्ये सुरुवातीला सभासद व ठेवीदार, कर्जदार यांचे स्वागत केले.
संचालक मंडळ निवडणुकीमध्ये सभासदांनी घैसास-गुंदेचा पॅनेलला निर्विवाद बहुमत देऊन विजयी केले. बँकेने एप्रिल २०२३ ते सप्टेंबर २०२३ या काळात रु. १७ कोटी एनपीए कर्जाची वसुली केलेली आहे. राईट ऑफ केलेल्या खात्यातून




