डॉ.पाउलबुधे डी.फार्मसीमध्ये फ्रेशर पार्टीतून नवगतांचे स्वागत
कॉलेज जीवनातील आनंदा बरोबरच करिअर घडविणे महत्वाचे : आर.डी.बुचकुल
अहमदनगर : पहिली ते पाचवी पर्यंत शालेय जीवनात शाळा, पुस्तके, शिक्षक यांची ओळख होते. 10 वी पर्यंत शिकतांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी शिक्षणाचे महत्व कळते. 10 वी, 12 वी ही वर्षे पुढील शिक्षणाची दिशा ठरविणारी असतात. कॉलेज जीवनात आपण वेगळ्या वातावरणात येतो. मौज, मस्ती, आनंदाचा बहर येतो, या आनंदाबरोबरच पुढे आपले करिअर घडविणे महत्वाचे असते. कॉलेज जीवनातील सहकारी हे कायम आपल्या स्मरणात राहत असतात. त्यांच्याबरोबर घालविले क्षण आणि विचारांची देवाण-घेवाण जीवनात उपयोगी पडते, असे प्रतिपादन सेवा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष आर.डी.बुचकुल यांनी केले.
वसंत टेकडी येथील डॉ.ना.ज.पाउलबुधे कॉलेज ऑफ डी फार्मसीच्या फ्रेशर पार्टीतून नवगतांचे स्वागत समारंभ पार पडला. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष आर.डी.बुचकुल, सेक्रेटरी आर.ए.देशमुख, खजिनदार दादासाहेब भोईटे, संचालक साई पाउलबुधे, कॅम्पस इंन्चार्ज डॉ.रेखाराणी खुराणा, बी.फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.निलेश जाधव, डी. फार्मसी कॉलेजच्या प्राचार्या अनुराधा चव

