अहमदनगर - बालविवाह मुक्त अहमदनगर जिल्हा व बेटी बचाव बेटी पढाव मुलीच्या जन्माचे स्वागत करा या दोन सामाजिक समस्या घेऊन स्नेहालय अहमदनगर, रोटरी क्लब अहमदनगर, जिल्हा प्रशासन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, राजमुद्रा ग्रुप तसेच जिल्हा सायकल असोसिएशन अहमदनगर यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 16 जानेवारी 2024 ते दिनांक 26 जानेवारी 2024 या कालावधीत अहमदनगर जिल्हा मध्ये सायकल रॅली काढण्यात आली.
रॅलीचा शुभारंभ जिल्हाधिकारी सलीमठ यांनी स्नेहालयामध्ये हिरवा झेंडा दाखवून केले. संपूर्ण जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी पथनाट्य द्वारा वरील विषयांमध्ये जनजागृती निर्माण करण्यात आली. अहमदनगर पाथर्डी शेवगाव येथे जिल्हा मराठा संस्थेचे न्यू आर्ट्स अँड कॉमर्स महाविद्यालयात 1500 विद्यार्थी विद्यार्थिनी समवेत बालविवाह प्रतिबंध व बेटी बचाव बेटी पढाव बाबतची प्रतिज्ञा घेण्यात आली. या कामी शेवगाव डॉक्टर तसेच शेवगावची तहसीलदार व महाविद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले.
संगमनेर येथे सह्याद्री कॉलेजच्या भव्य प्रांगणात बालविवाह मुक्त अहमदनगर जिल्हा व बेटी बचाव बेटी पढाव या दोन विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले व विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा देण्यात आली. या कामी महाविद्यालयाचे प्राचार्य खेमनर सर, गुंजाळ सर यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच संगमनेर येथील शारदा शिक्षण संस्थेचे मातोश्री रुदा मालपाणी विद्यालय येथे सुद्धा प्रतिज्ञा घेण्यात आली व पथनाट्य द्वारा जनजागृती करण्यात आली. या कामी संस्थेचे अध्यक्ष सुवर्णाताई मालपाणी यांनी मोलाचे सहकार्य केले. तर नंतर गुहा राहुरी सोनई शनिशिंगणापूर व स्नेहालय असा दहा दिवसांमध्ये 500 किलोमीटरचा प्रवास करून 26 जानेवारी 2024 रोजी सायकल यात्रा सायंकाळी चार वाजता स्नेहालय येथे पोहोचली. स्नेहाला येथे बेटी बचाव बेटी पढाव या योजनेच्या आद्य प्रवर्तक डॉ सुधाताई कांकरिया यांच्या हस्ते स्नेहालय मध्ये सायकल यात्रेचा समारोप करण्यात आला.
Thanks Watching & Reading News, Articles. Regards, Lokheet Graphic, News and Educational Purpose Channel.