लोकशाहीसाठी झटणारे कार्यकर्ते हेच लोकशाहीचा पाचवा स्तंभ : प्रा. डॉ. सुरेश पठारे
छायाचित्रकार संदेश भंडारे यांच्या तमाशा आणि वारी स्लाईडशो संवादाने लोकशाही उत्सवाची सांगता
अहमदनगर (प्रतिनिधी) - येथील लोकशाही उत्सव समितीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या धुमधडाक्यात लोकशाहीच्या उत्सवाची विविध उपक्रमांनी उजळणी झाली. लोकशाहीसाठी धोक्याच्या व सामाजिक दूषित काळात शहर व जिल्ह्यातील लोकांनी मोठा प्रतिसाद दिला.
लोकशाही उत्सवाचे विविध क्षण.
उत्सवाचे उदघाटन पारनेर तालुक्यातील धोत्रे येथील शांतिनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी येथे झाले. सुधीर विद्यार्थी लिखीत मनिष मुनी दिग्दर्शित आणि अभिनित 'अशफाकराम' या एकपात्री प्रयोगाने सुरूवात करण्यात आली. हा एकपात्री प्रयोग महान क्रांतिकारक शहीद अशफाकुल्ला खान आणि पंडीत रामप्रसाद बिस्मिल यांच्या मैत्रीवर आधारीत आहे. या उत्सवाचे मुंबईचे कॉ. सुबोध मोरे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. बालरेड्डी, जयदीप पवार, प्राची देवढे, प्रियांका साबळे, रमेश बारगजे, प्रा. राजू डहाळे, कॉ. प्रा. डॉ. महेबुब सय्यद, शहेनाज सय्यद, उज्ज्वला वाकळे, समीक्षा वाकळे, युनूसभाई तांबटकर, हेरंब कुलकर्णी, आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन कांचन जाधव यांनी केले तर वैष्णवी पटेकर, श्रेया बिडवई, बुशरा शेख यांनी कार्यक्रमाच्या सुरवातीला क्रांतिगीते सादर केली.
२७ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता रहेमत सुलतान हॉल, सर्जेपुरा येथे समतेच्या गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी युवा शाहीर हर्षदीप सविता शरदकुमार, शुभम डांगे, समृद्धी वाकळे, अशोक सब्बन, वैष्णवी पटेकर आदींसह शांतिनिकेतन फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थीनींनी समतेची गीते गायली. या प्रसंगी प्रा. एस. जे. शिंदे यांनी हार्मोनियम तर दत्तात्रय खांदवे यांनी ढोलकीवर साथसंगत केली.
२८ जानेवारीला एमआयडीसीतील सह्याद्री चौकामधे जागर लोकशाहीचा या पथनाट्याचे उदघाटने डॉ. संजीव गडगे आणि अनिल सत्रे या माजी सैनिकाच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. त्यानंतर कोहिनूर मंगल कार्यालया समोरील रस्ता, प्रोफेसर कॉलनी चौक, अहमदनगर शहरातील माळीवाडा, पुणे स्टँड व तारकपूर स्टँड या तिन्ही एसटी स्टँड, दिल्लीगेट आदी ठिकाणी शिवाजी नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली साने गुरुजी कला पथकाने 'जागर लोकशाहीचा' या विषयावर पथनाट्याचे सादरीकरण केले. भैरवनाथ वाकळे यांनी पथनाट्यास ढोलकची तर डॉ. प्रशांत शिंदे यांनी खंजीरीची साथ दिली. पथनाट्यामधे नागरिकांचा उत्साही सहभाग झाला होता. पुणे स्टँड येथे बुलढाणा येथील ज्येष्ठ नागरीक महिलांनी नाचगाणे गात सहभाग नोंदविला.
सोमवारी ता. २९ रोजी सिध्देश्वर मेटे महाराज, डॉ. प्रशांत शिंदे, प्रा. महेबूब सय्यद यांनी अहमदनगर शहरात विविध ठिकाणी शिक्षण संस्थांमधे विद्यार्थ्यांना लोकशाहीचे महत्त्व या विषयावर व्याख्याने दिली.
लोकशाही उत्सवाच्या समारोपाचा कार्यक्रम सीएसआरडी समाजसेवा महाविद्यालयातील ऑडिटोरियम हॉल येथे झाला. यामध्ये जगप्रसिध्द छायाचित्रकार संदेश भंडारे यांच्या तमाशा आणि वारी या छायाचित्रांच्या स्लाईड शो आणि संवादाच्या कार्यक्रम झाला. न्यू आर्टस कॉलेजच्या कम्युनिकेशन डिपार्टमेंटचे प्रमुख प्रा. संदिप गिऱ्हे यांनी भंडारे यांची सविस्तर मुलाखत घेतली. त्यामध्ये तमाशा आणि वारी याविषयी सविस्तर माहिती दिली गेली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. सुरेश पठारे यांनी लोकशाही उत्सावाचे कौतुक करून लोकशाहीसाठी झटणारे कार्यकर्ते हेच लोकशाहीचा पाचवा स्तंभ आहेत याबाबत उदाहरणासह माहिती दिली. तसेच लोकशाही वाचविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सॅम्युअल वाघमारे, प्रस्तावना सोनाली देवढे शिंदे तर पाहुण्यांचा परिचय समृध्दी वाकळे व ॲड. विद्या जाधव शिंदे यांनी करून दिला. शेवटी आभार संध्या मेढे यांनी मानले.
या लोकशाही महोत्सवाच्या निमंत्रक सोनाली देवढे-शिंदे, संध्या मेढे, ॲड. विद्या जाधव शिंदे, समृद्धी वाकळे यांच्या नेतृत्वाखाली या सर्व कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते.
Thanks Watching & Reading News, Articles. Regards, Lokheet Graphic, News and Educational Purpose Channel.