इकबाल बागवान तर्फे मोहंमद रफींचा जन्म शताब्दी सोहळा संपन्न

इकबाल बागवान तर्फे मोहंमद रफींचा जन्म शताब्दी सोहळा संपन्न

सुरांच्या माध्यमातून शब्दांना सौंदर्य देणारा गायक मोहंमद रफी -इकबाल बागवान

Muhammad Rafi's Birth Centenary Ceremony was completed by Iqbal Bagwan


नगर- शब्द हे फार काही करु शकते. कवींनी लिहिलेल्या गीतांमुळे माणसाला आकाशात असल्याचे भासावून जाऊ शकते. तर त्याच शद्बांनी माणसाची निचांकी ही होते. अशाच या कवींनी लिहिलेल्या गीतांना जोपर्यंत सुरांची साथ मिळत नाही तो पर्यंत ते रसिकांना आवडत नाही.या कार्यात सुरांच्या माध्यमातून शब्दांना सौंदर्य देण्यात मोहंमद रफि यांचा हातखंडा होता, असे प्रतिपादन संगीतप्रेमी व रफी प्रेमी इकबाल बागवान यांनी केले.


इकबाल बागवान प्रस्तुत न्यू स्टार ग्रुप च्यावतीने स्व.मोहंमद रफी यांच्या जयंतीच्या शताब्दी वर्षानिमित्त 'जिंदगी तो बेवफा है एक दिन ठुकरायेगी’ चे रहमत सुलतान सभागृहात आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बागवान बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिवन फाऊंडेशनचे अध्यक्ष सय्यद आरिफ, नासिर पहेलवान, आलमगीर न्युज चे जहिर शेख, अकील बॉस, सामाजिक कार्यकर्ते एहसान कासम शेख,एड. अमीन धाराणी, विदया तन्वर, कमरुद्दीन भाई, मुसा शेख, साजीद भाई, नवाज शेख, अब्दुल शेख आदि मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मोहंमद रफी यांना अभिवादन करण्यात आले.


कार्यक्रमाची सुरुवात इकबाल बागवान यांनी मोहंमद रफी यांचे गाजलेले गीत ‘ऐ मेरे दोस्त लौट के आजा ’ या गीताने प्रारंभ केला. तसेच ‘गर तुम भुला ना दोगे’, ‘कैसे जित लेते है लोग दिल कीसी का.. मोहब्बत के सुहाने दिन.. मैने रखा है मोहब्बत अपने अफसाने का नाम.. कहानियां सुनाती है पवन आती जाती... चले थे साथ मिल के.. ही व अशी मोहंमद रफीची प्रसिद्ध अनेक गाणी एकबाल बागवान यांनी सादर केली.


विशेष करुन ऐ मेरे दोस्त लौट के आजा.. मैने पुछा चांद से... क्या हुवा तेरा वादा.. मेरे दोस्त किस्सा ये क्या हो गया... तु ही वो हसीं है.. या गाण्यांना प्रेक्षकांनी भरभरून टाळ्यांच्या व शिट्ट्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.


कार्यक्रमाच्या शेवटी एकबाल बागवान यांनी ‘जिंदगी तो बेवफा है एक दिन ठुकरायेगी ..’ या गीताने सभागृहाला हेलावून कार्यक्रमाचा समारोप केला. सूत्रसंचालन आबीद दुलेखान यांनी केले, प्रास्तविक रफिक शेख यांनी केले तर आभार मुन्ना शेख यांनी मानले. कार्यक्रमास मोहंमद रफी यांचे गीतप्रेमी व संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.