राज कपूर यांना त्यांच्या गीतांच्या माध्यमातून राजकुमार गुरनानी यांच्या स्वरछंद ग्रुप तर्फे स्वरांजली
जाने कहां गये वो दिन... सत्यम शिवम सुंदरम... राम तेरी गंगा मैली हो गई पापियों के पाप धोते धोते... अश्या मधुर गीतांनी राज कपूर यांची जन्मशताब्दी साजरी
नगर - सिनेमाच्या अनेक टोकांना स्पर्श करणारा भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात शोमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज कपूर यांना चित्रपटाची कौटुंबिक पार्श्वभूमी असेल, पण त्यांनी स्वत:च्या संघर्षातून आपलं स्थान मिळवलं. राज कपूर (1924-1988) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक उत्तम अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक होते यात शंका नाही. एकोणिसाव्या शतकाच्या चाळीस आणि पन्नाशीच्या दशकात, जेव्हा भारतीय चित्रपट सुरुवातीच्या टप्प्यात होता आणि देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला होता, तेव्हा आर्थिक आणि तांत्रिक साधनांचा तुटवडा होता. राज कपूरचे ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट विषय निवड, संपादन, गाणी, संगीत, संवाद, वैचारिक परिपक्वता यासारखे घटक आपल्याला आश्चर्यचकित करतात. त्यांचे अनेक चित्रपट भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील मैलाचे दगड आहेत. आज त्यांची शताब्दी पूर्ण होत आहे. पण त्यांचे उत्कृष्ट कार्य सदैव स्मरणात राहील.असे प्रतिपादन संगीतप्रेमी व स्वरछंद ग्रुपचे राजकुमार गुरनानी यांनी केले.
स्वरछंद ग्रुपच्या वतीने व सहदेव ज्वेलर्सच्या सहकार्याने राज कपूर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या ब्लॅक अँड व्हाईट ते कलर चित्रपटातील गीतांची मैफिलीचे रावसाहेब पटवर्धन सावेडी येथे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रसिध्द सुफी गायक पवन नाईक, एड.रविंद्र शितोळे, अवतार मेहेरबाबाचे भक्त व भजन साम्रज्ञणी शोभा ढेपे, विनायक ढेपे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी सुरुवातीला वंदना जंगम यांनी भक्तीगीत सत्यम शिवम सुंदरम या सुरैल गीतांनी कार्यक्रमाची सुंदर सुरुवात केली.
त्याला पुढे माधुरी सोनटक्के व हेमंत नरसाळे यांनी ‘हर दिल जो प्यार करेगा ’.. हे गीत सादर करुन सभागृहाची वाह ऽ वाह सुरुवातीस मिळवून कार्यक्रमास रंग भरण्यास सुरुवात केली. यानंतर सुप्रिया भावसार व कैलास बेरड यांनी, आजा सनम मधुर चांदणी मे हम... हे प्रफुल्लीत गीत सादर केले. त्यानंतर स्वाती मुदगल व विजय माळी यांनी मोहब्बत है क्या चीज हमको बताओ... या गीताने सभागृहामध्ये टाळ्यांचा कडकडा निर्माण झाला. यानंतर बाॅबी चित्रपटातील ‘हम तुम एक कमरे में बंद हो ’ हे गीत मंदाकिनी पाडगावकर व चंदर ललवाणी यांनी सादर करुन सभागृहात चैतन्य निर्माण केले.
यानंतर वृषाली काळे व सुहास अंतरकर यांनी ‘प्यार हुवा ईकरार हुवा है प्यार से फीर क्यु डरता है दिल ..या गीताने सभागृहात हलचल निर्माण केली.तर वर्षा दुसेजा व हेमंत नरसाळे यांनी ‘मुझे कुछ कहना है, मुझे भी कुछ कहना है’.. हे गीत सादर करुन सभागृहास नाचवले. तर वंदना जंगम व मनोज जाधव यांनी ‘ये रात भीगी भीगी ये मस्त निगाहें’ या गीत द्वारे प्रेक्षकांची वाहऽ वाहऽ मिळविली. तर राजकुमार सहदेव यांनी ‘राम तेरी गंगा मैली हो गई पापीयो के पाप धोते धोते ’ हे गीत सादर करुन सभागृहास भक्तीमय करुन मंत्रमुग्ध केले. याव्यतिरिक्त कार्यक्रमात अखियो को रहने दे.. एक दिन बिक जायेगा माटी के मोल.. मेरा जूता है जपानी.. पंछी बनू उडती फिरून.. जाने कहां गये वो दिन.. घर आया मेरा परदेसी.. मै हू प्रेम रोगी.. बोल राधा बोल संगम होगा के नही.. राजा की आयेगी बारात.. मै शायर तो नही.. यशोमयती मैया से बोले नंदलाला असे सदाबहार गीते सादर करण्यात आली.
रसिकांनीही राजकपूर यांच्या प्रसिद्ध चित्रपटातील प्रसिद्ध मंत्रमुग्ध करणारे गाण्यांची मेजवानीच मिळाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज कपूर यांच्या जीवनातील अनेक प्रसिद्ध किस्से सांगून दीपा माळी यांनी पूर्ण कार्यक्रमाला शेवटपर्यंत बांधून ठेवले. आभार कार्यक्रमाचे आयोजक राजकुमार गुरनानी यांनी मानले. कार्यक्रमास संगीत रसिक व राज कपूरचे चाहते शेवटपर्यंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Thanks Watching & Reading News, Articles. Regards, Lokheet Graphic, News and Educational Purpose Channel.