मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीत
७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
नगर - मोहंमदिया एज्युकेशन सोसायटी संचलीत सावित्रीबाई फुले उर्दु प्राथमिक कन्या शाळा, मौलाना आझाद उर्दु मुलींचे हायस्कुल, मदर तेरेसा उर्दु ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स् फॉर गर्ल्स, मासुमिया डी.एल.एड्. कॉलेज (उर्दू) व मासुमिया शिक्षणशास्त्र महाविद्यालय, वाबळे कॉलनी, मुकुंदनगर, नगर येथे ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात कुरान पठणाने झाली.
हम्द व नाआत नंतर संस्थेचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा. डॉ. शेख अब्दुस सलाम अब्दुल अजीज यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. याप्रसंगी अरुणा आसिफ अली सामाजिक व शैक्षणिक महिला मंडळाच्या अध्यक्षा शेख फरीदा भाभी तसेच मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीचे सदस्य मिर्झा नवेद गयासबेग, शेख शरफोद्दीन जैनोद्दीन व इतर सभासद तसेच मुख्याध्यापक नौशाद सय्यद व सर्व शिक्षक वृंद, मुख्याध्यापिका फरहाना सय्यद व सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद, मदर तेरेसा उर्दु ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक वृंद, मासुमिया डी.एल.एड्. कॉलेज (उर्दू) व मासुमिया शिक्षणशास्त्र महाविद्यायाचे सर्व प्राध्यापक वृंद इत्यादी उपस्थित होते.
यावेळी प्रा.डॉ. शेख अब्दुस सलाम सर यांनी आपल्या भाषणात प्रजासत्ताक दिनाबद्दल "धार्मिक एकात्मता व अखंडता" व भारतीय घटनेबद्दल आपले सखोल व सविस्तर विचार व्यक्त केले. प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थीनींनी विविध गुणदर्शनपर कार्यक्रम सादर केले.
सुत्रसंचालन बहार सय्यद यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे नियोजन नाजेमा जुल्फेकार यांनी केले व शेवटी शेख अब्दुल हसीब यांनी सर्वांचे आभार मानले..
Thanks Watching & Reading News, Articles. Regards, Lokheet Graphic, News and Educational Purpose Channel.