एसटीचा फक्त एक रुपयात १० लाखांचा विमा !
नगर : एसटी बस अपघातात प्रवाशाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास १० लाख रुपये विम्यापोटी देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने काही वर्षापूर्वी घेतला आहे. त्याला 'हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात सहायता निधी योजना' असे नाव देण्यात आले आहे. पूर्वी एसटी बसला अपघात झाला तर महामंडळातर्फे नुकसानभरपाई दिली जात होती; परंतु ती तुटपुंजी होती. त्यात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यानुसार आता अपघातात मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास १० लाख रुपये, कायमचे अपंगत्व आल्यास पाच लाख रुपये, अंशतः अपंगत्व आल्यास अडीच लाख रुपये आणि तात्पुरते अपंगत्व आल्यास १ लाख रुपये दिले जात आहेत .*बसचा अपघात झाल्यास याप्रमाणे मिळते मदत*
*५ लाख*
कायमचे अपंगत्व आल्यास
*२.५ लाख*
अंशतः अपंगत्व आल्यास
*१० लाख*
मृत्यू झाल्यास
*१ लाख*
तात्पुरते अपंगत्व
*तिकिटात १ रुपया जास्त*
या विम्याचा लाभ मिळण्यासाठी प्रत्येक प्रवाशाकडून तिकिटावर एक रुपया अधिभार घेण्यात येत आहे, या नव्या विमा योजनेचा फायदा सेवेत असलेल्या एसटीच्या कर्मचाऱ्यांनादेखील मिळत आहे.
*एसटीकडून मिळाली नाही माहिती*
अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात एसटीचे किती अपघात झाले किंवा त्यात प्रवाशांच्या वारसांना किती विमा भरपाई मिळाली, याची माहिती अहिल्यानगर एसटी विभागीय कार्यालयाच्या संबंधित विभागाकडून मिळाली नाही.
Thanks Watching & Reading News, Articles. Regards, Lokheet Graphic, News and Educational Purpose Channel.