गुरुदेव डॉ . काटेस्वामीजी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
श्रीरामपूर (युवा ध्येय) : शहरातील गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन दिनदर्शिकाचे प्रकाशन श्रीरामपूर वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड.व्ही. एन. ताके पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन अनिरुद्ध महाले होते. तर लेखापरीक्षक डी. बी. मोरगे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी व भारतमाता यांच्या प्रतिमेचे पूजन करून नूतन दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी ॲड. ताके म्हणाले, संस्थेने सतरा वर्षांच्या वाटचालीत सभासद हिताचा कारभार केलेला असून सभासद व ठेवीदारांचे हित जपलेले आहे तसेच समाजातील गरजुंना व दुर्बल घटकांना कर्जरूपाने अर्थ पुरवठा करून अडचणीच्या काळात आधार दिलेला असून आत्मनिर्भर केलेले आहे तसेच वेळोवेळी सामाजिक बांधिलकीही जपलेली आहे. त्यामुळेच संस्था प्रगतिपथावर आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी डी.बी. मोरगे यांनीही आपल्या भाषणात परमपूज्य गुरूदेव महाराजांचे दिनदर्शिकामध्ये छापलेले विचार युवा पिढीला दिशादर्शक ठरतील असे सांगितले. अनिरुद्ध महाले यांचे अध्यक्षीय भाषण झाले त्यात त्यांनी दिनदर्शिका ही दिशादर्शिकाच असते आणि ती आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका करते असे सांगितले. सूत्रसंचालन डॉ. प्रशांत लखोटिया यांनी केले. यावेळी लोन कमिटी चेअरमन कल्पेश चोथाणी, संचालक बी.एन. पवार, बापूसाहेब गायकवाड, ज्ञानेश्वर शेळके, मॅनेजर गिरीजा टंकसाळे, ब्रँच मॅनेजर दीपक दवंगे, निर्मला येवले, भाऊसाहेब लगे, सचिन मुठे, अभिषेक कुसळकर उपस्थित होते.
Thanks Watching & Reading News, Articles. Regards, Lokheet Graphic, News and Educational Purpose Channel.