नगर- मास्टर हबीब यांनी सुफी कलाम जास्त प्रमाणात गायले पण त्याच बरोबर त्यांनी 1962 च्या चीन भारत युद्धाप्रसंगी लोकांमध्ये राष्ट्रीय जागृती व्हावी व प्रेरणा मिळावी म्हणून कव्वाली गायली होती. तसेच साईबाबांचे महात्म्ये जाणून त्यांनी त्यावरही काही चांगले कव्वाल्या गायले होते. जे आजही दक्षिणत्य राज्यात प्रसिद्ध आहे. ज्यामुळे त्यांनी त्याकाळी फक्त धार्मिकच नव्हे तर कव्वालीच्या माध्यमातून राष्ट्रवाद, जातीय सलोखा व मानवतावादाला प्रोत्साहन दिले होते. कव्वाली गायनाच्या माध्यमातून मास्टर हबीब यांनी अहमदनगरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवले, असे प्रतिपादन साहित्यप्रेमी अतीक शेख यांनी केले.
मखदूम सोसायटीच्यावतीने मास्टर हबीब निजामी कव्वाल यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात अतीक शेख बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून चांद सुलताना हायस्कुलचे माजी प्राचार्य अब्दुल कादिर सर, प्रा.डॉ. महबूब सय्यद, उबेद शेख, अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या सहसचिव डॉ.कमर सुरुर, इंजि. अनीस शेख,जीवन फाउंडेशनचे अध्यक्ष आरिफ सय्यद, तनवीर चष्मावाला, राजुभाई शेख, डॉ शमा फारुकी, मुस्कान फाउंडेशनचे अध्यक्ष शफकत सय्यद, तंन्जिमे उर्दु अदबचे आसिफ सर आदि मान्यवर उपस्थित होते.
आबीद दुलेखान यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, मास्टर हबीब यांनी प्रत्येक कव्वालीमध्ये जीवनातील वास्तवावर बोट ठेवले जात असे त्यांच्या कव्वाल्यांना आजही महाराष्ट्रापेक्षा आंध्रप्रदेश, कर्नाटक, राजस्थान, गुजरात, काश्मिरमध्ये भरपूर रसिकवर्ग आहे. अध्यक्षीय भाषणात कादिर सर म्हणाले की ते कसे मनमिळावू व अहमदनगरवर प्रेम करणारे होते. त्यावर त्यांनी प्रकाश टाकला.
यावेळी महफिल ए मुशायराचे आयोजन करण्यात आले होते.
ज्याचे दीप प्रज्वलन अतीक शेख यांच्या हस्ते करण्यात आले. या मुशायरयात बिलाल अहमदनगरी, सुलेमान अहमदनगरी, मुस्ताक सर, डॉ. कमर सुरूर, आसिफ सर, मुन्नवर हुसेन आदी शायरांनी आपल्या शायरीने रसिकांना मंत्रमुक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ कमर सुरुर यांनी केले. तर आभार आसिफ सर यांनी मानले.
Thanks Watching & Reading News, Articles. Regards, Lokheet Graphic, News and Educational Purpose Channel.