अलनुर आय केयर सेंटर तर्फे 343 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी 63 मोतीबिंदू शस्त्रक्रिया संपन्न

अलनुर आय केयर सेंटर तर्फे 343 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी 63 मोतीबिंदू शस्त्रक्रिया संपन्न

आधुनिक उपचारपद्धतीमुळे रोग निवारण मोठ्याप्रमाणात होत आहे - तनवीर चष्मावाला

नगर - बदलती जीवनशैली आणि वातावरणातील बदलांमुळे मनुष्याची प्रतिकार शक्ती कमी होत आहे. विशेषत लहान मुलांमध्ये आजारांचे प्रमाण वाढतांना दिसत आहे. दुषित पाणी, फास्ट फूड, अस्वच्छता यामुळे आजारांची उत्पत्ती होतांना दिसते. या वेगवेगळ्या आजारांचे निदानही अत्याधुनिक मशिनरीद्वारे करता येत असल्याने उपचार करणेही आता सोपे होत आहे. व मोबाईल च्या जास्त प्रमाणात वापरामुळे डोळ्यांच्या आजारात पण मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. उपचार वेळेत न झाल्याने आजार बळावतात. त्यासाठी अशा मोफत तपासणी शिबीराच्या माध्यमातून आजारांचे निदान वेळेत झाल्यास त्यावर उपचार करणे सोपे होणार आहे. त्यामुळे अशा शिबीरांची गरज आहे, असे प्रतिपादन अलनुर आय केयर सेंटरचे संचालक तनवीर चष्मावाला यांनी केले.
alnur



अलनुर आय केयर सेंटर व मखदुम सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने व एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय यांच्या सहकार्याने मुकुंदनगर येथे अलनुर आय केयर सेंटर मध्ये मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शास्त्रक्रिया तसेच अल्पदरात चष्मयाचे वाटप करण्यात आले. ज्यामध्ये 343 रुग्णांनी मोफत नेत्र तपासणी केली.व 63 रुग्णांचे मोतीबिंदू शास्त्रक्रिया मोफत करण्यात आले. रुग्णांची तपासणी देसाई हॉस्पिटलचे आनंद बोज्जा, शुभम बोज्जा, समता फाऊंडेशनचे अभिषेक शिंदे, तनवीर चष्मावाला, अल्ताफ शेख यांनी केली.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मख़दुम सोसायटीचे राजुभाई शेख, मुस्कान असोसिएशनचे शफकत सय्यद, डॉ. जहीर मुजावर, फैयाज मेंबर, शम्स खान, रियाज कुरैशी, डॉ. परवेज खान, बिल्स जिमच्या संचालिका शेख समरीन बिलाल, शेख तैबा, डॉ. शमा फारुकी, नुरसाहब शेख, जावेद मास्टर, रेहान शेख, अल्ताफ शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्तविकात राजुभाई शेख म्हणाले, आज विविध आजारांची उत्पत्ती ही हवा, पाणी, खाण्यातून होतांना दिसते. धकाधकीचे जीवन, वेळेवर न जेवणे, दुषित अन्न-पाणी, कोड्रिंक, फास्टफूड यामुळे बर्‍याच जणांना पोटाचे विकार होतात. यासाठी नियमित व्यायाम, संतुलीत आहार महत्वाचा आहे. प्रत्येकाने आपली प्रतिकार शक्ती वाढविण्याची गरज आहे. तसेच छोट-छोट्या व्याधींकडे दुर्लक्ष न करता नियमित तपासणी केल्यास भविष्यात उद्भवणारे आजारांवर वेळीच निदान होऊ शकते. यासाठीच मोफत तपासणी शिबीराच्या माध्यमातून रुग्णांना दिलसा देण्याचे काम अलनुर आय केयर सेंटरच्यावतीने करण्यात येत असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबीद दुलेखान यांनी केले. तर आभार नुरसाहब शेख यांनी मानले.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.