अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेतर्फे उर्दू सप्ताहाचे आयोजन

अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेतर्फे उर्दू सप्ताहाचे आयोजन


नगर - दरवर्षीप्रमाणे या वर्षीही अहमदनगर जिल्ह्यात उर्दू प्रेमींच्या सहकार्याने उर्दू सप्ताह साजरा केला जाणार आहे. या सप्ताहात सर्व शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक सक्रियपणे सहभागी होतात.या वर्षीचा तपशील खालील प्रमाणे आहे.

urdu sahitya


सोमवार १० फेब्रुवारी २०२५ रोजी उर्दू सप्ताहाचे उद्घाटन, उर्दू भाषेच्या इतिहासाचे वर्णन. उर्दू भाषेचे महत्त्व आणि इतिहास याबद्दल माहिती प्रदान करणे. मंगळवार ११ फेब्रुवारी रोजी मुलांना पाठ्यपुस्तकातील कविता म्हणणे. बुधवार १२ फेब्रुवारी रोजी उर्दू कॅलिग्राफी स्पर्धा,उर्दू वाचन स्पर्धा. गुरुवार १३ फेब्रुवारी रोजी बैत बाजी आणि कविता वाचन स्पर्धा होईल.


शनिवार १५ फेब्रुवारी रोजी पवित्र ग्रंथ स्तुती आणि पठण स्पर्धा. सोमवार १७ फेब्रुवारी रोजी उर्दू लेखक आणि कवींबद्दल माहिती. त्यांच्या नावांची यादी बनवुन आणि त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती लिहणे. मंगळवार १८ फेब्रुवारी रोजी उर्दू गीते, गझल आणि विनोदांचे पठण करने आणि ते लक्षात ठेवणे. गुरुवार २० फेब्रुवारी रोजी समारोप आणि पुरस्कार वितरण समारंभ घेतला जाईल असे अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे अध्यक्ष सलीम खान पठाण यांनी सांगितले.
या मेळाव्यात उर्दू आठवड्यात सहभागी होणाऱ्या मुलांचे तसेच या वर्षी ज्या पालकांनी आपल्या मुलांना शाळेत दाखल केले आहे त्यांचे विशेष स्वागत केले जाईल.


उर्दू सप्ताहात दररोज किंवा कोणत्याही एका दिवशी आपापल्या शाळांमधून पदवीधर झालेले आणि उर्दू माध्यमाच्या पलीकडे उच्च शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी आणि आज समाजात चांगले पद भूषवणाऱ्या किंवा यशस्वी उद्योजकांना मुलांसमोर आमंत्रित केले जाईल आणि त्यांचे स्वागत केले जाईल.असे सचिव आबीद दुलेखान यांनी सांगितले.


या व्यतिरिक्त उर्दूच्या प्रचारासाठी योग्य वाटणारी कोणतीही कृती शाळेत करता येईल.या सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना शाळा प्रशासन समिती, शिक्षक आणि समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने बक्षिसे दिली जाईल.असे सहसचिव डॉ कमर सुरुर यांनी सांगितले. सर्वांना प्रोत्साहन देण्यासाठी या उर्दू सप्ताहात सक्रिय असलेल्या सर्व शिक्षकांना जिल्हास्तरावर २० ते २५ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या समारंभात ट्रॉफी देऊन सन्मानित केले जाईल.असे सलीम खान पठाण यांनी सांगितले.


हा उर्दू सप्ताह यशस्वी करण्यासाठी उर्दू साहित्य परिषदेचे पदाधिकारी सर्वश्री के के खान,शरफुद्दीन शेख,अन्सार शेख, नवीद मिर्झा, शाकीर अहमद शेख, इमाम सय्यद, फैयाज शेख, शबनम खान, नर्गिस इनामदार, हनीफ शेख, नौशाद सैय्यद , अनिस शेख , बदर शेख ,जमीर शेख, साजिद कुरेशी,वसीम शेख, हारुण कुरेशी, जावेद शेख, सुभान सय्यद, नाजमा शेख,तनवीर रजा शेख, मोहम्मद उमर बागवान,फिरोज खान पठाण, अरबाज पठाण, शाहनवाज गुलाम, इकबाल काकर, मुबशीर खान, शबिस्ता शेख ,जहीर शेख,आरिफ दस्तगीर, महमूद शेख , मुनव्वर शेख, मतीन मनियार, हुसेन मोमीन, इलियास शहा, साजिद शेख, जहीर काकर, फिरोज शेख, उसमान तांबोळी, सिद्दीक बागवान, वहिदा सय्यद,शाहीन शेख, अल्ताफ शाह, आसिफ शेख, जाकीर शाह,मिनाज शेख,अस्मा पटेल, आमरीन पठाण, यास्मिन शेख, नसरीन इनामदार, नाजिया शेख व जिल्ह्यातील उर्दू साहित्य परिषदेचे सर्व पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.