अल-करम हाॅस्पिटलच्या रक्तदान शिबीरात 53 जणांचे रक्तदान

अल-करम हाॅस्पिटलच्या रक्तदान शिबीरात 53 जणांचे रक्तदान

युवकांनी रक्तदान चळवळीत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे- डॉ.अशपाक पटेल

नगर - रक्त हे कोणत्याही फॅक्टरीत तयार होत नसल्याने त्याची गरज भासल्यास मनुष्यालाच रक्तदान करावे लागते. एखाद्या रुग्णाला रक्ताची आवश्यकता भासल्यास त्यास ते वेळेत मिळणे गरजेचे असते. यासाठी युवकांनी रक्तदान करुन या चळवळीत सहभागी झाले पाहिजे. अत्याधुनिक उपचार पद्धतीने रक्ताचे विघटन होत असल्याने एका रक्तदात्याचा अनेकांना फायदा होत असल्याने या पुण्यकार्यात सहभागी व्हावे. अल-करम संस्थेच्यावतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमामुळे इतरांनाही प्रेरणा मिळणार आहे, अशा उपक्रमाची समाजाला गरज आहे,असे प्रतिपादन डायबेटोलॉजिस्ट अँड कार्डिओलॉजिस्ट डॉ. अशपाक पटेल यांनी केले.
alkaram




प्रजासत्ताक दिनानिमित्त अल-करम सोशल अ‍ॅण्ड एज्युकेशनल सोसायटीच्या अल करम हॉस्पिटलच्या वतीने चांदबीबी महल व अलकरम हॉस्पिटल मध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होेते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डायबेटोलॉजिस्ट व कार्डिओलॉजिस्ट डॉ. अशपाक पटेल, डॉ. जहीर मुजावर, डॉ. नजमा जहीर,डॉ. विश्वजीत पवार, अर्शद सैय्यद,एजाज तांबोली,समीर सैय्यद, शेरअली शेख, इंजि. उसामा शेख, इमरान भाईजान,तौफिक तांबोली आदि मान्यवर उपस्थित होते.
डॉ.जहीर मुजावर म्हणाले, आज प्रत्येकाचे जीवनमान धावपळीचे झाले आहे, त्यामुळे रस्ते अपघाताबरोबरच इतरही अनेक कारणांनी रक्ताची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर भासत असते. अशा परिस्थितीत प्रत्येकाने कर्तव्य म्हणून वर्षभरातून एकदातरी रक्तदान करुन आपले सामाजिक दायित्व पार पाडले पाहिजे. आपणही समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून रक्तदान करणे जरुरी आहे, असेही त्यांनी सांगितले.


रक्तसंकलनचे कार्य साई सेवा ब्लड सेंटर, ब्लड कंम्पोनंट अँड अफेरेसिस सेंटर अहमदनगर व अर्पण ब्लड बँक च्या भाग्यश्री मॅडम, किशन कराळे, प्रेम इंगळे, जमुना उगले, दुर्गा गरड आदींनी केले. या शिबीरात 53 रक्त पिशव्यांचे रक्तसंकलन करण्यात आले. या उपक्रमाचे समाजातून कौतुक होत आहे.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शेरअली शेख म्हणाले की अलकरम सोसायटीच्या माध्यमातून आरोग्याच्या क्षेत्रात वर्षभर समाज उपयोगी उपक्रम सतत राबविले जात असते. म्हणून या उपक्रमामध्ये समाजातील लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तौफिक तांबोली यांनी केले तर आभार समीर सय्यद यांनी मानले.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!