बहुभाषिक कवी संमेलनाने लोकशाही उत्सवाची गुरुवारी सांगता

बहुभाषिक कवी संमेलनाने लोकशाही उत्सवाची गुरुवारी सांगता

नगर- देश संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना भारताच्या लोकशाहीपुढे अनेक आव्हाने निर्माण झाली आहे. अशावेळी लोकशाही टिकली पाहिजे व ती तळागाळात झिरपली पाहिजे हा हेतूने अहिल्यानगरमध्ये सन २०२२ पासून लोकशाही उत्सवाला सुरुवात झाली. शहरातील वेगवेगळ्या पुरोगामी व समविचारी संघटनांनी एकत्रित येऊन हा उत्सव सुरू केला. 

bahubhashik



या वर्षी दि. २५ ते ३० जानेवारी २०२५ या दरम्यान लोकशाही उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या लोकशाही उत्सवाची सांगता गुरुवारी ३० जानेवारी रोजी बहुभाषिक कवी संमेलनाने होणार असल्याची माहिती लोकशाही उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. प्रशांत शिंदे यांनी दिली. 



गुरुवारी संध्याकाळी ५.३० वाजता नगर शहरातील रावसाहेब पटवर्धन स्मारक, सावेडी येथे प्रसिद्ध उर्दू शायरा डॉ. कमर सुरुर यांच्या अध्यक्षतेखाली हे बहुभाषिक कवी संमेलन होणार आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील कवयित्री प्रतिभा अहिरे, आझमगड येथील मुसेब आझमी, गोरखपूर येथील नोमान सिद्दिकी, नगर येथील बिलाल अहेमदनगरी इत्यादी नामवंत कवी या संमेलनात सहभागी होणार आहेत. 


या संमेलनामध्ये मराठी, हिंदी व उर्दू भाषेतील कविता व गझल सादर होणार आहेत. रसिकांनी या संमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन संमेलनाचे निमंत्रक सोनाली देवढे-शिंदे, संध्या मेढे, ऍड. विद्या जाधव-शिंदे, प्रमिला कार्ले, सुरेखा आडम व समृद्धी वाकळे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.