स्नेहालयमधील बालकांना ओमा फाउंडेशनतर्फे ट्रेकसूट वाटप

snehalaya

स्नेहालयमधील बालकांना ओमा फाउंडेशनतर्फे ट्रेकसूट वाटप

नगर : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट रोजी स्नेहालय संस्थेतील बालकांसाठी ओमा फाउंडेशनतर्फे ट्रेकसूट वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी वरिष्ठ पत्रकार भागा वरखडे आणि समाज सेविका  सुनिताताई वरखडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
snehalaya




ओमा फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे स्नेहालयमधील बालकांना एकसमान ड्रेसकोड उपलब्ध झाला आहे. ट्रेकसूट मिळाल्याने बालकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमाच्या वेळी स्नेहालय संस्थेच्या विश्वस्त मा. सपना असावा,निक कॉक्स, मुलामुलींच्या विभागाचे काम पाहणारे समाधान धालगुडे, चंद्रकांत शेंबडे,जनसंपर्क विभागाच्या संगिता सानप, ज्ञानेश्वर वाघ उपस्थित होते.

snehalaya


बालकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी सातत्याने सहकार्य करणाऱ्या ओमा फाउंडेशन व वरखडे परिवार यांचे स्नेहालय परिवारातर्फे संस्थेच्या सचिव डॉ प्रीती भोंबे यांनी मनःपूर्वक आभार मानले.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!