हर घर तिरंगा – विकसित भारत की ओर’चा संदेश देत स्नेहालयमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात

हर घर तिरंगा – विकसित भारत की ओर’चा संदेश देत स्नेहालयमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात



नगर : स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये १५ ऑगस्ट २०२६ रोजी भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन देशभक्ती, उत्साह आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यंदाची संकल्पना ‘हर घर तिरंगा – विकसित भारत की ओर’ अशी होती.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून स्नेहालयचे माजी विद्यार्थी व उद्योजक मा. वैभव बाळू रहाणे उपस्थित होते. तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष अमर गुरप सर, पदाधिकारी तागड सर, भोगा सर स्नेहालयचे विश्वस्त राजीव गुजर सर, संजय बंदिष्टी सर, संचालक हनीफ शेख, शाळेच्या संचालिका मंदा हांडे , पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सुजाता मासोळे, जयंती पाटील, सविताताई वाहूरवाघ, आयेशा शेख आणि मंगलताई गाडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.महाराष्ट्र अंमली पदार्थमुक्त अभियान व शून्य सहनशीलता (Zero Tolerance) धोरणांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थविरोधी जनजागृती करण्यात आली.

प्रमुख अतिथी मा. वैभव बाळू रहाणे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण, शिस्त, संस्कार आणि देशप्रेमाच्या माध्यमातून विकसित भारत घडविण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका शीतल गुंदेचा मॅडम, जयश्री खरात मॅडम, सविता बेल्हेकर मॅडम, सागर सर तसेच स्नेहालय परिवार सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. चंद्रकांत शेबडे सर यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांना गोड खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत,ध्वजप्रतिज्ञा तसेच ‘नशामुक्त विद्यार्थी – नशामुक्त महाराष्ट्र’ प्रतिज्ञा घेतली. आकर्षक परेड, देशभक्तीपर गीत व नृत्य,भाषणे,स्वातंत्र्यसैनिकांच्या वेशभूषा आणि पिरॅमिड प्रात्यक्षिकाने विद्यार्थ्यांनी उपस्थितांची वाहवा मिळवली.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!