ग्लोबल मानव पब्लिक सेवा समीतीच्या जिल्हा सचिवपदी फैसर शेख
1
August 25, 2021
अहमदनगर - ग्लोबल मानव पब्लिक सेवा समितीच्या अहमदनगर जिल्हा सचिवपदी शेख फैसर फारुक यांची निवड करुन जिल्हाध्यक्ष मुस्तफा गनी खान यांनी नियुक्ती पत्र दिले. याप्रसंगी शहर अध्यक्ष जमिलउद्दीन सय्यद (कविजंग जहागिरदार),जुनेद तांबटकर,शोएब खान,आरीफ कुरैशी,सरफराज शेख,कैस शेख, अंजुम ईनामदार,शोएब जहागीरदार,उमर कुरैशी,शमशेर खान आदि उपस्थित होते.
याप्रसंगी मुस्तफा खान म्हणाले, समाजातील दु:ख, त्यांच्या अडीअडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी ग्लोबल मानव पब्लिक सेवा समितीच्या माध्यमातून कार्यकर्ते काम करत आहेत. शासनाच्या अनेक योजना आहेत, परंतु त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहचत नाही. मध्यस्ती लोक भ्रष्टाचारासाठी या योजनांचा लाभ संबंधितांना मिळू देत नाही. त्यासाठी संघटना या विरोधात आवाज उठवत आहे. अहमदनगरमध्ये अनेक सामाजिक कार्यकर्ते संघटनेशी जोडले जात आहेत. आज नियुक्त झालेले फैसर फारुक शेख सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या संघटनेची जबादारी देण्यात आली असून, ते या पदाच्या माध्यमातून अहमदनगर मधील प्रश्नांना प्राधान्य देऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवतील, असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी फैसर शेख म्हणाले, संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कार्यरत राहू. समाजातील वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करु, असे सांगून नियुक्तीबद्दल वरिष्ठ पदाधिकार्यांचे आभार मानले.
याप्रसंगी जमील कवीजंग जहागीरदार आदिंनी आपल्या मनोगतातून संघटनेच्या कार्याची माहिती दिली.


congratulations
ReplyDelete