सावित्री-फातेमा विचार मंचच्यावतीने पैगंबर जयंतीनिमित्त ऑनलाईन प्रश्नमंजुषा

विजेत्यांना 2 लाख 25 हजारांच्या बक्षिसांची घोषणा

नगर - साने गुरुजी लिखित ‘इस्लामी संस्कृति’ या पैगंबर चरित्रावरील पुस्तकाच्या प्रस्ताविकात आदरणीय विनोबाज़ी भावे लिहितात, हिंदू आणि मुसलमान हज़ारों वर्षांपासून भारतात एकत्र राहत आहेत. तथापि एकमेकांच्या थोर पुरुषांविषयी आणि धर्मग्रंथांविषयी एकमेकांना पुरेशी काय, फ़ारशी माहिती नसते. ती असणे जरूरी आहे. कारण आम्हाला एकत्र नांदायचे आहे आणि एकत्र नांदून, विविधतेत एकता कशी राखता येते, इतकेच नव्हे, विविधतेनेच एकता कशी खुलते, हे जगाला दाखवायचे आहे. या दृष्टिने प्रस्तुत पुस्तक विशेष स्वागतर्ह आहे.

या उदिष्टांसाठी पैग़ंबर जयंती निमित्त ‘सावित्री फातेमा विचारमंच अहमदनगर’ तर्फे साने गुरुजी लिखित ‘इस्लामी संस्कृती’ या पुस्तकावर आधारित ऑनलाइन स्पर्धा परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा विशेषतः अहमदनगर जिल्ह्यासाठी आयोजित केली आहे.
ही स्पर्धा 3 गटांमध्ये घेतली जाईल. गट नं. 1 - 10वी ते 12वी., गट नं.2 पदवीधर, पदव्युत्तर आणि पी.एच.डी., गट नं. 3 - खुला गट


प्रत्येक गटांमध्ये अनुक्रमे पहिले बक्षिस रु. 31000/-, दूसरे रु. 21000/-, तिसरे रु. 11000/- अशी तीन बक्षिसे दिली जातील. या व्यतिारिक्त प्रत्येक गटात प्रत्येकी रु. 1100/- अशी अकरा बक्षिसे उत्तेजनार्थ दिली जातील. स्पर्धेत सहभागी होणार्या प्रत्येकाला प्रमाणपत्र दिले जाईल. नावनोंदणी शुल्क प्रत्येकी रु. 50/- असेल. नावनोंदणी ऑनलाइन केली जाईल. नाव नोंदणीची अंतीम तारीख 30/10/2021 आहे. परीक्षेच्या दिवशी प्रश्नपत्रिका ऑनलाइन पाठवली जाईल.


नावनोंदणी झाल्यानंतर प्रत्येकाला साने गुरूजींचे लिखित ‘इस्लामी संस्कृती’ हे पुस्तक मोफत दिले जाईल. 21/11/2021 रोजी 100 मार्काची परीक्षा घेतली जाईल. परिक्षेनंतर बक्षिस वितरणाचा कार्यक्रमांत विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक बक्षिसे दिली जातील.


उपरोक्त स्पर्धेत अधिकाधिक संख्येने सहभागी होऊन समाजात सदभावना वृद्धिंगत करण्याचा कार्यात सहभागी व्हावे, नांव नोंदणी करण्यासाठी - https://rzp.io/l/QFNA1KVJh या लिंक चा वापर करावे.असे आवाहन मंचच्यावतीने डॉ. सर्जेराव निमसे, अॅनड. संभाज़ी बोरुडे, ह.भ.प.अजय महाराज बारस्कर, कॉ. बहिरनाथ वाकळे, डॉ. सय्यद रफिक, हाजी शौकतभाई तांबोली, मौलाना इर्शाद मखदूमी यांच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सय्यद आमिर - 9226701819, शेख उमेर- 9260505000, शेख मुनज़्ज़र - 9422212332 यांच्याशी संपर्क साधावा.

Post a Comment

2 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. Sir exam ki fees kam karo

    ReplyDelete
    Replies
    1. धिक माहितीसाठी सय्यद आमिर - 9226701819, शेख उमेर- 9260505000, शेख मुनज़्ज़र - 9422212332

      Delete

Thanks Watching & Reading News, Articles. Regards, Lokheet Graphic, News and Educational Purpose Channel.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!